Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी

Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला. निफ्टी ११२ अंकांनी घसरून २५,७६७ वर उघडला, तर सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून ८४,०६० वर उघडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:01 IST2025-11-14T10:01:08+5:302025-11-14T10:01:08+5:30

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला. निफ्टी ११२ अंकांनी घसरून २५,७६७ वर उघडला, तर सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून ८४,०६० वर उघडला होता.

bihar election result 2025 Stock Market Today Market falls more than 100 points in early trade Nifty below 25800 | Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी

Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला. निफ्टी ११२ अंकांनी घसरून २५,७६७ वर उघडला, तर सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून ८४,०६० वर उघडला होता. गेल्या चार सत्रांपासून बाजार तेजीत होता. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये निफ्टीने १०० अंकांपेक्षा जास्त घसरण सुरू ठेवली, जी २५,८०० च्या खाली घसरली. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकालही आज जाहीर होणार आहेत. बाजाराचे लक्ष आजच्या निकालांवर आहे. जर निकाल एक्झिट पोलशी जुळले नाहीत तर बाजारात मोठी घसरण होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्यात. परिणामी, दिवसभर अस्थिरता अपेक्षित आहे.

सकाळी ९:३० वाजता, सेन्सेक्स २५० अंकांपेक्षा जास्त खाली आला होता. सध्या, निर्देशांकातील टॉप ३० पैकी ११ शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत, तर १९ शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत. इटर्नल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अ‍ॅक्सिस बँक आणि एशियन पेंट्स जोरदार व्यापार करत आहेत, तर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स, इन्फोसिस आणि टाटा स्टील सारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन

जागतिक बाजारातील संकेत कमकुवत

जागतिक बाजारांबद्दल बोलायचं झालं तर, अमेरिकन बाजारात प्रॉफिट बुकिंग नोंदवण्यात आली आणि डाऊ जोन्स जवळजवळ ८०० अंकांनी घसरून बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांच्या कृतींबद्दल बोलायचं झालं तर, काल रोख बाजारात एफआयआयनी ३८३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सलग दुसऱ्या दिवशी एकूण ९९३ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी झाली, ज्यामध्ये रोख रक्कम, स्टॉक आणि इंडेक्स फ्युचर्सचा समावेश आहे. देशांतर्गत फंड्स किंवा डीआयआयएसने सलग ५४ व्या दिवशी एकूण ३,०९२ कोटी रुपयांची खरेदी केली.

 

 

Web Title : शेयर बाजार में गिरावट: चुनाव नतीजों के बीच निफ्टी 25,800 से नीचे

Web Summary : शेयर बाजार लाल निशान में खुला, निफ्टी 25,800 से नीचे गिरा। चुनाव नतीजों और कमजोर वैश्विक संकेतों से बाजार में अस्थिरता है। निवेशक सतर्क हैं, चुनाव परिणाम के आधार पर संभावित बाजार में उतार-चढ़ाव की आशंका है। एक्सिस बैंक में सकारात्मक गतिविधि देखी गई।

Web Title : Stock Market Plunges: Nifty Below 25,800 Amid Election Results

Web Summary : The stock market opened in the red, with Nifty falling below 25,800. Election results and weak global cues contribute to market volatility. Investors are cautious, anticipating potential market swings based on the election outcome. Axis Bank showed positive movement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.