Lokmat Money >शेअर बाजार > रिच डॅड, पुअर डॅडच्या लेखकाचं मोठं भाकीत; पुढील महिन्यात शेअर बाजार 'ऐतिहासिक' कोसळणार

रिच डॅड, पुअर डॅडच्या लेखकाचं मोठं भाकीत; पुढील महिन्यात शेअर बाजार 'ऐतिहासिक' कोसळणार

Share Market Crash : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमची धडधड वाढवू शकते. फेब्रुवारीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचं भाकित प्रसिद्ध लेखकाने वर्तवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:47 IST2025-01-27T16:46:57+5:302025-01-27T16:47:31+5:30

Share Market Crash : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमची धडधड वाढवू शकते. फेब्रुवारीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचं भाकित प्रसिद्ध लेखकाने वर्तवलं आहे.

biggest stock market crash coming in february claims author of rich dad poor dad robert kiyosaki | रिच डॅड, पुअर डॅडच्या लेखकाचं मोठं भाकीत; पुढील महिन्यात शेअर बाजार 'ऐतिहासिक' कोसळणार

रिच डॅड, पुअर डॅडच्या लेखकाचं मोठं भाकीत; पुढील महिन्यात शेअर बाजार 'ऐतिहासिक' कोसळणार

Share Market Crash :शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सध्या वाईट दिवस सुरू आहेत. एकीकडे अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस जवळ येत असताना दुसरीकडे बाजारात तीव्र घसरण पाहायला मिळत आहे. आज जवळपास ९.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत. ही घसरण तुम्हाला मोठी वाटत असाल तर थांबा. कारण, हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं आम्ही नाही तर रिच डॅड अँड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटलं आहे. शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण फेब्रुवारीमध्ये दिसून येईल, असं भाकित त्यांनी सांगितलं आहे.

लेखक रॉबर्ट कियोसाकी याचं भाकीत नेमकं काय?
"शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे." असं ट्विट रॉबर्ट कियोसाकी यांनी केलंय. मात्र, यामुळे ते निराश नाहीत. उलट ही घसरण गुंतवणूकदारांना खरेदीची उत्तम संधी देईल, असा त्यांना विश्वास आहे. ते म्हणाले की बाजारातील मंदीच्या काळात कार आणि घरे यासारख्या मालमत्ता स्वस्त होतात. स्टॉक आणि बाँड मार्केटमधून बाहेर आलेला पैसा विशेषत: बिटकॉइनमध्ये गुंतवला जाईल. क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रचंड वाढ होईल, असा त्याचा अंदाज आहे. कियोसाकी यांनी २०१३ मध्ये लिहिलेल्या त्यांच्या रिच डॅड्स प्रोफेसी या पुस्तकात याबाबत इशारा दिला होता. ते म्हणाले की ही घसरण इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक मंदीलाही मागे टाकेल.

बिटकॉइनवर डाव
ते म्हणाले की, शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित आणि अधिक फायदेशीर पर्याय शोधतील. यामुळे बिटकॉइनमध्ये मोठी तेजी पाहायला मिळणार आहे. वास्तविक, आत्ताच बिटकॉइनची किंमत जवळपास ८६ लाखाच्या आसपास गेली आहे. ट्रम्प यांच्याप्रमाणे कियोसाकी हे बिटकॉइन, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचे दीर्घकाळापासून समर्थक आहेत. जेव्हा स्टॉक आणि बाँड्स सारख्या पारंपारिक मालमत्ता जेव्हा घसरतात तेव्हा बाजारातील अस्थिरतेच्या काळात बिटकॉइन वाढीसाठी एक उत्तम संधी आहे.

शेअर मार्केट कोसळ्याचे कारण काय?
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून डॉलर दिवसेंदिवस मजबूत होत चालला आहे. तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे. परिणामी परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर बाजारातून पैसा काढून घेत आहेत. दुसरं म्हणजे ट्रम्प अमेरिकन सेंट्रल व्याजदरात कपात करणं थांबवू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या तिमाहीच्या निकालातील मंदीमुळे शेअर बाजारात कमकुवतपणा दिसून येत आहे. 
 

Web Title: biggest stock market crash coming in february claims author of rich dad poor dad robert kiyosaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.