Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात गुंतवणूकीची मोठी संधी; येत्या दोन वर्षांत येणार 1 हजार कंपन्यांचे IPO...

शेअर बाजारात गुंतवणूकीची मोठी संधी; येत्या दोन वर्षांत येणार 1 हजार कंपन्यांचे IPO...

भारताने 2024 मध्ये IPO व्हॉल्यूमच्या बाबतीत यूएस आणि युरोपला मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 21:46 IST2025-01-17T21:37:40+5:302025-01-17T21:46:59+5:30

भारताने 2024 मध्ये IPO व्हॉल्यूमच्या बाबतीत यूएस आणि युरोपला मागे टाकले आहे.

Big investment opportunity in the stock market; IPO of 1000 companies to come in the next two years... | शेअर बाजारात गुंतवणूकीची मोठी संधी; येत्या दोन वर्षांत येणार 1 हजार कंपन्यांचे IPO...

शेअर बाजारात गुंतवणूकीची मोठी संधी; येत्या दोन वर्षांत येणार 1 हजार कंपन्यांचे IPO...

Share Market IPO :शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या दोन वर्षांत शेअर बाजारात पैशाचे असे वादळ येणार आहे, जे पाहून संपूर्ण जग थक्क होईल. एका अहवालानुसार, पुढील दोन आर्थिक वर्षांत 1000 कंपन्या शेअर बाजारात त्यांचे IPO लॉन्च करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शेअर बाजारातून कमाई करण्याची चांगली संधी असणार आहे.

दरम्यान, सध्या गुंतवणूकदारांचा कल प्राथमिक बाजाराकडे अधिक तर दुय्यम बाजाराकडे कमी दिसतोय. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, दुय्यम बाजाराचे मूल्यांकन बरेच जास्त आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार प्राथमिक बाजारातील कमी मूल्यांकन असलेल्या IPO मध्ये गुंतवणूक करून नफा मिळविण्याचा मार्ग निवडत आहेत.

दोन वर्षांत 1000 IPO येणार
असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडिया (AIBI) ने शुक्रवारी सांगितले की, सूमारे 1 हजार कंपन्या पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये (2025-27) त्यांचे IPO लॉन्च करू शकतात. बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि नियामक संरचनेत सुधारणा, ही IPO ची संख्या वाढण्याची मुख्य कारणे आहेत. विशेष म्हणजे, या IPO द्वारे 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम उभारली जाणार आहे. 

गेल्या 6 आर्थिक वर्षात 851 IPO
आश्चर्यकारक बाब म्हणजे गेल्या सहा आर्थिक वर्षांत 900 IPO अद्याप बाजारात आलेले नाहीत. आकडेवारीनुसार, गेल्या 6 वर्षांत केवळ 851 कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. ज्यांनी एकत्रितपणे 4.58 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. त्यापैकी 281 मोठ्या कंपन्या होत्या तर छोट्या आणि मध्यम कंपन्यांची (एसएमई) संख्या 570 होती. 2023-24 या आर्थिक वर्षात IPO द्वारे एकूण 67,955 कोटी रुपये उभारण्यात आले. 

अमेरिका आणि युरोपला मागे टाकले
AIBI चे अध्यक्ष महावीर लुनावत यांनी सांगितले की, भारताने 2024 मध्ये IPO व्हॉल्यूमच्या बाबतीत जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. 335 IPO सह भारताने यूएस आणि युरोप या दोन्ही देशांना मागे टाकले, ज्यांच्याकडे यूएस आणि युरोपपेक्षा जास्त सूचीबद्ध IPO आहेत.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Big investment opportunity in the stock market; IPO of 1000 companies to come in the next two years...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.