lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > "आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं

"आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं

...याचा अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्तीही निम्म्यावर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:34 PM2023-02-03T15:34:12+5:302023-02-03T15:34:25+5:30

...याचा अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्तीही निम्म्यावर आली आहे.

Big fall in Adani Group's shares in the stock market, Modi government also spoke clearly | "आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं

"आमचं काही घेणं-देणं नाही...;" अदानी ग्रुपवरील संकटावर मोदी सरकार स्पष्टच बोललं

उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. यावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, अदानी समूहाच्या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. हिंडेनबर्ग या अमेरिकन संस्थेच्या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेससह समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने घसरत आहेत. 

याचा अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्तीही निम्म्यावर आली आहे. अशा स्थितीत या संकटाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सभागृहात अदानी समूहाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत आहेत.

अदानी समूहाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय? असे विचारले असता मोदी सरकारचे मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, 'अदानी समूहाच्या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही. विरोधकांकडे दुसरा कुठल्ही मुद्दा नाही. यामुळे ते हा मुद्दा उपस्थित करत आहेत. अदानी प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरू आहे.

काँग्रेस, शिवसेना, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसीसह अनेक विरोधी पक्षांनी शुक्रवारीही कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू केला. यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.

गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत 'टॉप-२०'मधूनही गेले बाहेर -
Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये झालेल्या पडझडीमुळे ते आता श्रीमंतांच्या यादीत थेट २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता ६१.३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे आणि गेल्या २४ तासात त्यांना १०.७ अब्ज डॉलरचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेअर्समधील घट पाहता गौतम अदानी आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गपेक्षाही मागे गेले आहेत. झुकरबर्गची एकूण संपत्ती ६९.८ अब्ज डॉलर इतकी आहे आणि तो श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहे. 
 

Web Title: Big fall in Adani Group's shares in the stock market, Modi government also spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.