Investment Return: शेअर बाजारातील गुंतवमूक जोखमीच्या अधीन असते, मात्र कधी-कधी असा शेअर हाती लागतो, जो अल्पावधीत मालामाल करतो. BoAt चे सहसंस्थापक आणि शार्क टॅंक इंडियातील लोकप्रिय जज अमन गुप्ता यांनीही अशाच एका गुंतवणुकीचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, स्नॅक ब्रँड ‘लेट्स ट्राय’ने त्यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा परतावा दिला आहे.
तब्बल 33,233% परतावा; Nvidia लाही मागे टाकले
अमन गुप्तांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, लेट्स ट्रायमधील गुंतवणूक माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी ठरली. त्यांनी मस्करीत म्हटले की, मी Nvidia चिप्समधून पैसे कमावू शकलो नाही, पण भुजिया चिप्समधून नक्की कमावले. अमन यांनी एनव्हिडियामध्ये किती गुंतवणूक केली होती, हे मात्र उघड केले नाही. पण त्यांच्या मते लेट्स ट्रायमधील परतावा हा एनव्हिडियाच्या कमाईलाही मागे टाकणारा आहे.
अमनची गुंतवणुकीची स्टाईल
गुंतवणूक कशी करतात याबद्दल बोलताना अमन म्हणाले की, मी कधीच एक्सेल शीट इन्व्हेस्टर नव्हतो. मी फॉर्म्युला पाहत नाही, मी फाउंडर्समध्ये गुंतवणूक करतो. त्यांच्या मते उद्योजकांची जिद्द, दृष्टीकोन आणि वेगळं काही करण्याची तयारी, हीच खऱ्या गुंतवणुकीची कारणे असतात. अमन गुप्ताने या ब्रँडमध्ये फक्त 12 लाखांची गुंतवणूक केली होती. अवघ्या चार वर्षांत अमनला तब्बल 40 कोटी रुपयांचा परतावा मिळाला. म्हणजेच, चार वर्षांत 333 पट परतावा मिळाला. शार्क टॅंक इंडियाच्या इतिहासातील हा त्यांचा सर्वोत्तम रिटर्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लेट्स ट्राय’ नेमकं काय करते?
लेट्स ट्राय ही एक भारतीय स्नॅक कंपनी आहे, जी आलू वेफर्स, भुजिया आणि विविध हेल्दी स्नॅक आयटम्स बनवते. कंपनीची प्रोडक्ट्स भारतात BigBasket, Blinkit, Flipkart, Amazon, Swiggy Instamart, DMart, Reliance Retail, Zepto यांसारख्या ऑनलाइन-ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
