Lokmat Money >शेअर बाजार > एअरटेल होतेय मालामाल! गुंतवणूकदारांना देणार ११४ टक्के अधिक लाभांश, काय आहे गुपित?

एअरटेल होतेय मालामाल! गुंतवणूकदारांना देणार ११४ टक्के अधिक लाभांश, काय आहे गुपित?

HSBC Expectation : एअरटेल कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना नवीन वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी तयार आहेत. यावेळी गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:51 IST2025-01-09T11:46:15+5:302025-01-09T11:51:31+5:30

HSBC Expectation : एअरटेल कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना नवीन वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी तयार आहेत. यावेळी गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी होणार आहे.

bharti airtel dividend will surge upto 114 percent hsbc expectation due to telecom company growth and cash flow | एअरटेल होतेय मालामाल! गुंतवणूकदारांना देणार ११४ टक्के अधिक लाभांश, काय आहे गुपित?

एअरटेल होतेय मालामाल! गुंतवणूकदारांना देणार ११४ टक्के अधिक लाभांश, काय आहे गुपित?

Airtel Dividend News : टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या एन्ट्रीनंतर अनेक कंपन्यांचा बाजार उठला. अशा परिस्थितीतही एक कंपनीने तगडी स्पर्धा दिली. याची फळं आता कंपनीसोबत गुंतवणूकदारही चाखत आहेत. आम्ही एअरटेल कंपनी विषयी बोलत आहोत. एअरटेलची वाढती ग्राहक संख्या कंपनीची तिजोरी भरत आहेत. परिणामी एअरटेलही आपल्या गुंतवणूकदारांवर उदार झाली आहे. ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीच्या अंदाजानुसार, एअरटेल २०२५ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ११४ टक्के अधिक लाभांश देऊ शकते.

गेल्या वर्षी प्रति शेअर १७ रुपये लाभांश दिला होता. अशा प्रकारे गेल्या ३ वर्षांत लाभांश चौपट होईल. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की एअरटेलच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. होम ब्रॉडबँड घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. याशिवाय, फ्री कॅश फ्लो देखील चांगल्या स्थितीत आहे.

एअरटेलची टार्गेट प्राईस किती आहे?
HSBC ने या दूरसंचार कंपनीची टार्गेट प्राईस १९४० रुपये प्रति शेअर ठेवली आहे. जे बुधवारी बाजार बंद होण्याच्या वेळी १५९९ रुपयांच्या दरापेक्षा २१.३ टक्के अधिक आहे. कंपनीचे प्रवर्तक लाभांश देण्यास अधिक उत्सुक आहेत. कारण नोव्हेंबर २०२४ मध्ये नवीन गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीच्या कर्जाचा बोजा कमी झाला आहे. प्रवर्तकाच्या निधीची आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या गुंतवणूकदारांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी अंतर्गत तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. फक्त त्याची तयारी जाहीर व्हायची आहे. गुंतवणूकदारांना लवकरच ही चांगली बातमी मिळू शकते. एचएसबीसी ब्रोकरेजने अनेक आधारांवर आपले अंदाज तयार केले आहेत.

एअरटेल कंपनीची सातत्याने वाढ
लाभांश जाहीर झाल्यामुळे एअरटेलचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसह प्रवर्तकांमध्येही उत्साह आहे. अलीकडच्या काळात एअरटेल कंपनीच्या वाढीनेही मोठी झेप घेतली आहे. ट्रायचे अलीकडील आकडे देखील या खासगी टेलिकॉम कंपनीची वाढ स्पष्ट करतात. कंपनीच्या मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
 

Web Title: bharti airtel dividend will surge upto 114 percent hsbc expectation due to telecom company growth and cash flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.