Bharat Global Developers Stock Price : भारत ग्लोबल डेव्हलपर्सच्या (BGDL Stock Price) शेअर्सनं गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिलाय. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर बंद झाले. शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी कंपनीचा शेअर ११८३ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोहोचला.
यंदा कंपनीनं गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. बीजीडीएलचे शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत ५६ रुपयांवरून ११८३ रुपयांवर पोहोचले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे २००० टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचा परतावा २६४७ टक्के आणि तीन वर्षांत ८३५३ टक्के राहिला आहे.
टाटा अॅग्रोसोबत मोठा करार
बीजीडीएलच्या शेअर्समध्ये या वाढीचं मुख्य कारण म्हणजे कंपनीने जाहीर केलेला १,६५० कोटी रुपयांचा वार्षिक सप्लाय कॉन्ट्रॅक्ट आहे. बीजीडीएलच्या उपकंपनीनं टाटा अॅग्रो अँड कन्झ्युमर प्रॉडक्ट्ससोबत हा करार केला आहे. या अंतर्गत बीजीडीएल पुढील १२ महिन्यांत चहा पावडर, कॉफी बीन्स, ऑर्गेनिक डाळी, नारळ, भुईमूग, मोहरी, तीळ, बदाम, काजू, जायफळ आणि अक्रोड सारख्या प्रीमियम ड्रायफ्रूट्सचा पुरवठा करेल.
काय म्हटलं कंपनीनं?
टाटा अॅग्रोसोबतच्या या भागीदारीमुळे त्यांची टॉप लाइन आणि बॉटम लाइन मजबूत होईल, असं कंपनीनं म्हटलं. या व्यवहारातून ११% ते १४% दरम्यान मार्जिन मिळण्याची अपेक्षा कंपनीनं व्यक्त केलीये. 'कृषी उत्पादन क्षेत्रात अग्रेसर होण्याचं आमचं ध्येय आहे. उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांची स्थिर मागणी आमच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे. मजबूत पुरवठा साखळी आणि कौशल्याद्वारे आम्ही आमच्या गुंतवणूकदार आणि भागीदारांसाठी मूल्य निर्माण करत आहोत, असं कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.