Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला

गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला

Brokerage Report : आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म 'बर्नस्टीन'ने भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढवणार अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:57 IST2026-03-26T13:57:12+5:302026-03-26T13:57:52+5:30

Brokerage Report : आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म 'बर्नस्टीन'ने भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढवणार अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Bernstein Cuts Nifty 50 Target to 26,000 for 2026 Amid Rising Oil Prices and Inflation | गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला

गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला

Brokerage Report : जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता भारतीय शेअर बाजाराच्या भविष्यातील वाटचालीवर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म 'बर्नस्टीन'ने २०२६ या कॅलेंडर वर्षासाठी निफ्टी ५० चे लक्ष्य घटवून २६,००० केले आहे. यापूर्वी हे लक्ष्य अधिक होते, मात्र महागाई आणि व्याजदर कपातीला होणारा विलंब पाहता ब्रोकरेजने आपला अंदाज बदलला आहे.

महागाई ६ टक्क्यांच्या पार जाण्याची भीती
ब्रोकरेजच्या मते, आगामी उन्हाळ्यात देशातील महागाईचा दर ६ टक्क्यांचा टप्पा ओलांडू शकतो. याचा थेट परिणाम रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर होईल. महागाई वाढल्यामुळे व्याजदर कपातीचा निर्णय किमान दोन तिमाहींसाठी टळू शकतो. चढे व्याजदर कॉर्पोरेट नफा आणि ग्राहकांच्या खर्चावर मर्यादा आणू शकतात. वाढत्या खर्चामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

निफ्टी १९,००० पर्यंत घसरण्याची भीती?
बर्नस्टीनने एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचाही इशारा दिला आहे. जर मध्य-पूर्वेतील संघर्ष अधिक काळ खेचला गेला आणि कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ चढे राहिल्या, तर निफ्टी २०,००० च्या खाली आणि अगदी १९,००० च्या पातळीपर्यंत घसरू शकतो.

ऊर्जेचा तुटवडा आणि रुपयावर दबाव
पश्चिम आशियातील युद्धामुळे केवळ 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' विस्कळीत झाली नसून, अनेक तेल आणि गॅस प्लांट्सचेही नुकसान झाले आहे. हे प्रकल्प पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, ज्यामुळे ऊर्जेचा तुटवडा दीर्घकाळ राहील. परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून काढलेला पैसा आणि कच्च्या तेलाची आयात महागल्याने रुपयावर वर्षभर दबाव राहण्याची शक्यता आहे.

वाचा - फक्त १,००,००० रुपयांची गुंतवणूक करुन कोट्यधीश व्हा; म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणुकीचे 'हे' आहे सूत्र

गुंतवणूकदारांसाठी 'वेट अँड वॉच'चा सल्ला

  • ब्रोकरेजने सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
  • मिड-कॅप आणि स्मॉल-कॅपपासून दूर राहा : जोपर्यंत मध्य-पूर्वेतील स्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत छोट्या आणि मध्यम शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करणे टाळावे.
  • संकेतांची प्रतीक्षा करा : बाजारातील सध्याची घसरण ही केवळ भावनिक नसून ती आर्थिक आकडेवारीवर आधारित आहे. त्यामुळे स्पष्ट संकेत मिळेपर्यंत वाट पाहणे हीच सर्वोत्तम रणनीती ठरेल.
     

Web Title : निवेशक सावधान! 'इंतजार करो और देखो' ही रणनीति: ब्रोकरेज की सलाह।

Web Summary : अनिश्चित वैश्विक बाजार और बढ़ते तेल की कीमतें भारतीय शेयरों को प्रभावित करती हैं। बर्नस्टीन ने निफ्टी 50 का लक्ष्य घटाया। महंगाई 6% से अधिक हो सकती है, जिससे दर में कटौती में देरी होगी। सबसे खराब स्थिति में निफ्टी 19,000 तक गिर सकता है। निवेशक इंतजार करें और देखें, मिड और स्मॉल कैप से बचें।

Web Title : Investors beware! 'Wait and Watch' is the strategy: Brokerage advises caution.

Web Summary : Uncertain global markets and rising oil prices impact Indian stocks. Bernstein cuts Nifty 50 target. Inflation may exceed 6%, delaying rate cuts. Nifty could fall to 19,000 in worst-case scenarios. Investors should wait and watch, avoiding mid and small caps.