Navratna Stock: नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (BEL) शेअर्सनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोमवार २३ जून रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स ४१६.९५ रुपयांवर पोहोचले. गेल्या ४ महिन्यांत नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या १० वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सनी १ लाख रुपयांची गुंतवणूक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त केली आहे. बोनस शेअर्सच्या बळावर कंपनीच्या शेअर्सनी हा टप्पा गाठलाय. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं गेल्या १० वर्षांत ३ वेळा त्यांच्या शेअर्सधारकांना बोनस शेअर्स वाटलेत.
३ वेळा दिलेत बोनस शेअर्स
नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं (BEL) गेल्या १० वर्षात ३ वेळा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिलेत. कंपनीनं सप्टेंबर २०१५ मध्ये १:२ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीने प्रत्येक १ शेअरसाठी २ बोनस शेअर्स वाटले. भारत इलेक्ट्रॉनिक्सने सप्टेंबर २०१७ मध्ये १०:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक १० शेअरसाठी भागधारकांना १ बोनस शेअर दिला. कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये १:२ च्या प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले.
१ लाखांचे झाले १ कोटी
१२ जून २०१५ रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (BEL) शेअर्स ३२.८६ रुपयांवर होते. जर एखाद्या व्यक्तीनं १२ जून २०१५ रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स १ लाख रुपयांना खरेदी केले असते तर त्याला कंपनीचे ३०४० शेअर्स मिळाले असते. नवरत्न कंपनीनं सप्टेंबर २०१५ पासून शेअरहोल्डर्सना ३ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं दिलेले बोनस शेअर्स जोडल्यास एकूण शेअर्सची संख्या ३०,०९६ होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे शेअर्स सोमवार २३ जून २०२५ रोजी ४१६.९५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. अशा परिस्थितीत, ३००९६ शेअर्सचं सध्याचं मूल्य १.२५ कोटी रुपये झालंय.
(टीप: यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)