Bajaj Finance Ltd Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गेल्या चार ट्रेडिंग सेशन्समध्ये शेअर बाजारात तेजी आली. दरम्यान, बजाज फायनान्स लिमिटेडच्या (Bajaj Finance Ltd Share) शेअर्सच्या कामगिरीवर एक्सपोर्ट बुलिश दिसून येत आहेत. ब्रोकरेज हाऊसेस या शेअरच्या कामगिरीबाबत खूप पॉझिटिव्हदेखील दिसत आहेत. यामागचं कारण म्हणजे एमडी आणि सीईओ राजीव जैन यांच्याशी संबंधित माहिती. कंपनीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली आहे.
कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर आज बीएसईवर तेजीसह ८९६०.०५ रुपयांवर उघडला. सकाळच्या सुमारास कंपनीच्या शेअरचा भाव ३.२६ टक्क्यांहून अधिक वाढून ९०७० रुपयांवर पोहोचला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे.
एमडींशी संबंधित ती बातमी काय?
बजाज फायनान्सने राजीव जैन यांची तीन वर्षांसाठी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलीये. त्यांचा कार्यकाळ १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार असून त्यांच्या जागी उपव्यवस्थापकीय संचालक अनुपकुमार साहा यांची नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. राजीव जैन २००७ मध्ये बजाज फायनान्समध्ये सीईओ म्हणून रुजू झाले. २०१५ मध्ये त्यांची एमडी म्हणून नियुक्ती झाली होती.
एक्सपर्ट बुलिश
सीएनबीसी टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार बजाज फायनान्सला कव्हर करणाऱ्या ५ एक्सपर्टनं हा शेअर १० हजारांच्या पार जाईल असा अंदाज व्यक्त केलाय. तर सीएलएसएनं शेअरला ११ हजार रुपयांचं टार्गेट प्राईज निश्चित केलंय.
गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे. अवघ्या ९० दिवसांत शेअर्सच्या किंमतीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर एका वर्षात ३३ टक्क्यांहून अधिक परतावा देण्यात हा शेअर यशस्वी ठरला आहे. गेल्या ५ वर्षात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)