Lokmat Money >शेअर बाजार > बॅक टू बॅक अपर सर्किट, गुजरातच्या 'या' कंपनीनं बनवलं करोडपती; ३ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न 

बॅक टू बॅक अपर सर्किट, गुजरातच्या 'या' कंपनीनं बनवलं करोडपती; ३ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न 

Multibagger Stock : शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली असली तरी काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. सततच्या तेजीमुळे यात गुंतवणूक करणारे कोट्यधीश झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:26 IST2025-01-01T11:26:28+5:302025-01-01T11:26:28+5:30

Multibagger Stock : शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली असली तरी काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. सततच्या तेजीमुळे यात गुंतवणूक करणारे कोट्यधीश झाले आहेत.

Back to back Upper Circuit Mercury Ev Tech Ltd Gujarat s company made investors millionaire More than 10000 percent return in 3 years | बॅक टू बॅक अपर सर्किट, गुजरातच्या 'या' कंपनीनं बनवलं करोडपती; ३ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न 

बॅक टू बॅक अपर सर्किट, गुजरातच्या 'या' कंपनीनं बनवलं करोडपती; ३ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न 

Multibagger Stock : शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली असली तरी काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. अशाच एका शेअर मंगळवारी अप्पर सर्किट लागलं. यामुळे पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. मर्क्युरी ईव्ही-टेक लिमिटेड (Mercury Ev-Tech Ltd) असं या शेअरचं नाव आहे. ही गुजरातची कंपनी आहे. कंपनीच्या शेअरने मंगळवारी ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. या तेजीमुळे शेअरचा भाव ९० रुपयांवर गेला आहे. यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं आणि नंतर शेअरचा भाव ९४.५४ रुपयांवर पोहोचला.

वर्षभरात घसरण

गेल्या ६ महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांना २६.५७ टक्के नफा दिला आहे. दुसरीकडे एका वर्षाच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. त्यात वर्षभरात २२.७८ टक्के घट झाली आहे.

३ वर्षात केलं कोट्यधीश

गेल्या वर्षभरात या शेअरनं गुंतवणूकदारांचं नुकसान केलं असलं तरी तीन वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी त्याच्या शेअरची किंमत ८५ पैसे होती. आता त्याची किंमत ९० रुपये झाली आहे. या तीन वर्षांत १०४.९३ टक्के परतावा दिला आहे.
जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली असती. म्हणजे एक लाख रुपये गुंतवून तुम्ही तीन वर्षांत कोट्यधीश झाला असता.

५ वर्षात २५०००% पेक्षा जास्त परतावा

या शेअरने ५ वर्षात २५६२५% परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या शेअरची किंमत फक्त ३५ पैसे होती. जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Back to back Upper Circuit Mercury Ev Tech Ltd Gujarat s company made investors millionaire More than 10000 percent return in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.