Lokmat Money >शेअर बाजार > Asian Paints : एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका

Asian Paints : एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका

Stock Market News: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत शेअर बाजारात भूकंप आला आहे. याचा थेट परिणामी आशियातील शेअर बाजारावर दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:18 IST2024-12-19T11:09:10+5:302024-12-19T11:18:04+5:30

Stock Market News: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत शेअर बाजारात भूकंप आला आहे. याचा थेट परिणामी आशियातील शेअर बाजारावर दिसून येत आहे.

Asian Paints Sees Decline in Stock Trading Today stock market crash tremendous fall | Asian Paints : एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका

Asian Paints : एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका

Stock Market News : अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीनंतर जगभरातील शेअर बाजारांना धक्के बसू लागले आहेत. खुद्द जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतातही याचा परिणाम दिसत असून शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ११५३ अंकांच्या घसरणीसह उघडला. यामध्ये मोठमोठे खेळाडूनही सापडले आहेत. एशियन पेंट्सही यातून सुटला नाही. एशियन पेंट्सचा शेअर आज लाल रंगात उघडल्यानंतर ३ टक्के खाली घसरला.

एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यापर्यंत घसरण
शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, एशियन पेंट्स २३५९ रुपयांवर उघडला आणि २३५६.८ वर बंद झाला होता, यात थोडीशी घसरण झाली होती. सत्रादरम्यान स्टॉकने २३७२.७५ रुपयांचा उच्चांक आणि २३४१.१५ रुपयांचा नीचांक गाठला होता. एशियन पेंट्सच्या शेअरची किंमत आज ३% ने घसरली होती, सध्या २२८१.३५ वर व्यापार करत आहे. कंपनीच्या प्रतिस्पर्धी पिडीलाइट इंडस्ट्रीज, सोलर इंडस्ट्रीज इंडिया, एसआरएफ आणि फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर या क्षेत्रातील इतर कंपन्याचे शेअर्स देखील घसरत आहेत. दरम्यान, बेंचमार्क निर्देशांकनिफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे १.२४% आणि १.०८% ने घसरले आहेत. देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (१९ डिसेंबर) निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होत असून आज बाजारात प्रचंड दबाव पाहायला मिळत आहे. सकाळची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले.

शेअर बाजार का पडला?
फेडरल रिझर्व्हने बुधवारी रात्री प्रमुख व्याजदरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली. बाजाराला याची आधीच अपेक्षा होती. नवीन वर्षात फेडकडून दरकपातीबाबत गुंतवणूकदारांना भरपूर आशा होत्या. मात्र, फेडच्या निर्णयानंतर ते निराश झाले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये दोनदा ०.२५ टक्के कपात केली जाऊ शकते. तर यापूर्वी हा अंदाज ४ वेळा ०.२५ टक्के कपातीचा होता.

जागतिक बाजारातही घसरण
२०२५ मध्ये यूएस फेडच्या दर कपातीच्या अंदाजांचा जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम झाला आहे. बहुतांश आशियाई बाजार आज घसरले आहेत. एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅकमध्ये सुमारे ३ टक्के घसरण झाली. डाऊ जॉन्स २.५८ टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याचवेळी, अमेरिकन डॉलरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यूएस फेडच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलरने जवळपास २ वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे.

Web Title: Asian Paints Sees Decline in Stock Trading Today stock market crash tremendous fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.