Lokmat Money >शेअर बाजार > लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत

लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत

Arisinfra Solutions IPO: बीएसईवर कंपनीचा शेअर ६ टक्क्यांच्या सूटीसह २०९.१० रुपयांवर लिस्ट झाला. एनएसईवर हा शेअर ७ टक्क्यांच्या सूटीसह २०५ रुपयांवर लिस्ट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:33 IST2025-06-25T12:33:14+5:302025-06-25T12:33:14+5:30

Arisinfra Solutions IPO: बीएसईवर कंपनीचा शेअर ६ टक्क्यांच्या सूटीसह २०९.१० रुपयांवर लिस्ट झाला. एनएसईवर हा शेअर ७ टक्क्यांच्या सूटीसह २०५ रुपयांवर लिस्ट झाला.

Arisinfra Solutions IPO Queue to sell shares as soon as it was listed IPO made losses on the first day price rose to rs 200 | लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत

लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत

Arisinfra Solutions IPO: बांधकाम आणि इन्फ्रा सोल्युशन्स प्रोव्हायडर एरिक्सइन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ बुधवारी डिस्काऊंटसह लिस्ट झाला. बीएसईवर कंपनीचा शेअर ६ टक्क्यांच्या सूटीसह २०९.१० रुपयांवर लिस्ट झाला. एनएसईवर हा शेअर ७ टक्क्यांच्या सूटीसह २०५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंग नंतर बीएसईवर कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी घसरला आणि तो २०० रुपयांच्या किंमतीवर आला. यानंतर त्यात आणखी घसरण दिसून आली. आयपीओसाठी प्राइस बँड २१० ते २२२ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. या इश्यूला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत

किती मिळालेलं सबस्क्रिप्शन?

एरिइन्फ्रा सोल्युशन्सचा आयपीओ १८ जून ते २० जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला. निविदेच्या शेवटच्या दिवशी हा इश्यू २.६५ पट सब्सक्राइब झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) आकडेवारीनुसार, सुमारे ५०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ३,४६,६३,३८८ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली. रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सच्या (RII) बाबतीत ५.५९ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या श्रेणीत आयपीओ ३.१४ पट सब्सक्राइब झाला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) सेगमेंटला १.४२ पट सब्सक्राइब करण्यात आलं. एरिक्सइन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडने अँकर गुंतवणूकदारांकडून २२५ कोटी रुपये गोळा केले आहेत.

कंपनीची योजना काय?

हा आयपीओ नो ऑफर फॉर सेल (ओएफएस) सह ४९९.६ कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आहे. आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनीच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी, उपकंपनी बिल्डमेक्स-इन्फ्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, एरिक्सयुनिटर्न रिझोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीच्या विद्यमान भागधारकांकडून अंशत: भागभांडवल खरेदी करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Arisinfra Solutions IPO Queue to sell shares as soon as it was listed IPO made losses on the first day price rose to rs 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.