Lokmat Money >शेअर बाजार > ३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स

३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स

Aris Infra Solutions IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. येत्या काळात अनेक मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:00 IST2025-01-20T16:00:21+5:302025-01-20T16:00:21+5:30

Aris Infra Solutions IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. येत्या काळात अनेक मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.

Aris Infra Solutions IPO open on February 3 Now available in the grey market at Rs 101 premium see details | ३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स

३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स

Aris Infra Solutions IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. येत्या काळात अनेक मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यामध्ये एरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओचा (Aris Infra Solutions IPO) समावेश आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार बुधवार, ५ फेब्रुवारी पर्यंत गुंतवणूक करू शकतील. आयपीओचा प्राइस बँड २०० ते २१० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. याची लॉट साइज ७० शेअर्स प्रति लॉट आहे.

ग्रे मार्केटमध्ये आधीच तेजी

Investorgain.com आकडेवारीनुसार हा शेअर ग्रे मार्केटमध्ये १०१ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की हे शेअर्स आयपीओच्या अपर प्राईजच्या बँडमध्ये २१० रुपये ३११ रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. यातून सुमारे ४९ टक्के नफा होत असल्याचं दिसून येत आहे. १० फेब्रुवारीला बीएसई आणि एनएसईवर हे शेअर्स लिस्ट होतील.

अधिक माहिती काय?

कंपनी बांधकाम आणि पायाभूत सुविधा कंपन्यांना सामग्री खरेदी करण्यास आणि त्यांचे फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मदत करते. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स या बिझनेस-टू-बिझनेस (B2B) टेक फर्मनं बांधकाम आणि पायाभूत सुविधा कंपन्यांना सामग्री खरेदी आणि त्यांचे फायनान्स मॅनेज करण्यासाठी मदत करण्यावर लक्ष केंद्रित केलंय. बाजारातून ६०० कोटी रुपये उभं करण्याचं उद्दिष्ट ठेवून कंपनी शेअर्सचा बुक बिल्ट इश्यू लाँच करत आहे. या इश्यूमध्ये २.८६ कोटी इक्विटी शेअर्सच्या नव्या इश्यूचा समावेश आहे. बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी आयपीओ बंद होत असल्यानं गुरुवार, ६ फेब्रुवारीला हे वाटप अंतिम होण्याची शक्यता आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Aris Infra Solutions IPO open on February 3 Now available in the grey market at Rs 101 premium see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.