Lokmat Money >शेअर बाजार > नवं वर्ष, नवी ओळख, अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचं नाव बदलणार; शेअर ट्रेडिंग झालंय बंद, जाणून घ्या

नवं वर्ष, नवी ओळख, अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचं नाव बदलणार; शेअर ट्रेडिंग झालंय बंद, जाणून घ्या

Swan Energy Limited: अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका कंपनीचं नाव आता बदललं आहे. ही कंपनी आता नव्या वर्षापासून नव्या नावानं ओळखली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:08 IST2025-01-03T14:08:23+5:302025-01-03T14:08:23+5:30

Swan Energy Limited: अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका कंपनीचं नाव आता बदललं आहे. ही कंपनी आता नव्या वर्षापासून नव्या नावानं ओळखली जाणार आहे.

Anil Ambani s reliance defence name change swan energy limited Share trading has been closed know everything | नवं वर्ष, नवी ओळख, अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचं नाव बदलणार; शेअर ट्रेडिंग झालंय बंद, जाणून घ्या

नवं वर्ष, नवी ओळख, अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचं नाव बदलणार; शेअर ट्रेडिंग झालंय बंद, जाणून घ्या

Swan Energy Limited: अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका कंपनीचं नाव आता बदललं आहे. ही कंपनी आता नव्या वर्षापासून नव्या नावानं ओळखली जाणार आहे. आम्ही रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (RNEL) बद्दल बोलत आहोत. स्वान एनर्जी लिमिटेडनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये, अधिग्रहित कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेडचं (आरएनएएल) नाव बदलून 'स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड' करण्यात आल्याचं म्हटलंय. 

२ जानेवारीपासून ही कंपनी नव्या नावाने ओळखली जाऊ लागलीये. स्वान एनर्जी लिमिटेडनं गेल्या वर्षी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंगचे अधिग्रहण पूर्ण केलं. बीएसईवर रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंगच्या शेअर्सचं ट्रेडिंग बंद असून अंतिम शेअरची किंमत २.२७ रुपये आहे.

अधिक माहिती काय?

गेल्या वर्षी स्वान एनर्जी लिमिटेडनं अनिल अंबानी समूहातील रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग (RNEL) या कंपनीचे अधिग्रहण केलं होतं. नवीन अधिग्रहणाच्या मदतीनं, स्वान एनर्जी लिमिटेड नौदल संरक्षण तसंच ऑईल आणि गॅस जहाजांच्या बांधकामात स्वतःला सर्वात मोठ्या खाजगी कंपनीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आखत आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रात ग्रीन शिप ब्रेकिंग, जहाज दुरुस्ती आणि जागतिक उत्पादनाचं केंद्र बनण्याचं त्यांचं उद्दीष्ट आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने आरएनईएलसाठी २,१०० कोटी रुपयांच्या बोलीला मंजुरी दिली. आईल आणि गॅस, रिअल इस्टेट आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात असलेल्या स्वान एनर्जी या वैविध्यपूर्ण व्यवसाय समूहाचा एसपीव्हीमध्ये ७४ टक्के हिस्सा आहे, तर हेजल मर्कंटाइलचा उर्वरित हिस्सा आहे.

Web Title: Anil Ambani s reliance defence name change swan energy limited Share trading has been closed know everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.