Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?

Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?

Anil Ambani Stocks: अनिल अंबानी समूहाच्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. यापूर्वी समूहाची ₹१,४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:47 IST2025-11-21T11:47:34+5:302025-11-21T11:47:34+5:30

Anil Ambani Stocks: अनिल अंबानी समूहाच्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. यापूर्वी समूहाची ₹१,४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

Anil Ambani reliance infra and power companies stocks down more than 60 percent Do you own any know dea | Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?

Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?

Anil Ambani Stocks: अनिल अंबानी समूहातील कंपन्यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स वाईट स्थितीत आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरले आहेत. शुक्रवारी बीएसईवर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स १६५.३० रुपयांवर घसरले. दरम्यान, रिलायन्स पॉवरचे शेअर्स ४० रुपयांच्या खाली आले. रिलायन्स पॉवरचे शेअर्स बीएसईवर ३९.१४ रुपयांवर घसरलेत.

६० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण

अनिल अंबानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरले आहेत. २७ जून २०२५ रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर ₹४२५ वर पोहोचलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २१ नोव्हेंबर रोजी बीएसईवर ₹१६५.३० वर घसरलेत. दरम्यान, रिलायन्स पॉवरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ४५% पेक्षा जास्त घसरले आहेत. रिलायन्स पॉवरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹७६.४९ आहे. २१ नोव्हेंबर रोजी अनिल अंबानी समूहाच्या या पॉवर कंपनीचे शेअर्स बीएसईवर ₹३९.१४ वर व्यवहार करत आहेत.

TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ

₹१,४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी १,४५२ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली. ईडीनं एका निवेदनात ही माहिती दिली. या घटनेला उत्तर देताना, रिलायन्स समूहानं म्हटलं की या मालमत्ता रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (आरकॉम) आहेत, जी २०१९ पासून या समूहाचा भाग नाही. ईडीच्या निवेदनात म्हटले आहे की एजन्सीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) एक तात्पुरता आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) आणि मिलेनियम बिझनेस पार्क, नवी मुंबई येथील अनेक इमारती तसंच पुणे, चेन्नई आणि भुवनेश्वरमधील भूखंड आणि इमारती जप्त केल्या आहेत. एजन्सीनं म्हटलंय की या मालमत्तांचे मूल्य ₹१,४५२.५१ कोटी आहे आणि ते रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि इतर काही कंपन्यांच्या आहेत. समूहानं एका निवेदनात म्हटलं की आरकॉम गेल्या सहा वर्षांपासून दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. निवेदनात असंही म्हटलं आहे की अनिल अंबानी कोणत्याही प्रकारे रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित नाहीत आणि त्यांनी सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये राजीनामा दिला होता.

पाच वर्षात रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये ७००% पेक्षा जास्त वाढ

अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षात ७००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स १९.६५ वर होते. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स १६५.३० वर पोहोचले. दरम्यान, गेल्या पाच वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १२००% वाढ झाली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ३ रुपयांवर होते. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ३९.१४ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : अनिल अंबानी के शेयरों में भारी गिरावट: रिलायंस इंफ्रा, पावर 60% से अधिक गिरे

Web Summary : अनिल अंबानी समूह के रिलायंस इंफ्रा और पावर के शेयरों में भारी गिरावट आई, जो 52 सप्ताह के उच्च स्तर से 60% से अधिक गिर गए। ईडी ने रिलायंस कम्युनिकेशंस से जुड़ी ₹1,452 करोड़ की संपत्ति जब्त की। हालिया गिरावट के बावजूद, रिलायंस इंफ्रा के शेयरों में 700% और रिलायंस पावर में पांच वर्षों में 1200% की वृद्धि हुई।

Web Title : Anil Ambani Stocks Plunge: Reliance Infra, Power Shares Crash Over 60%

Web Summary : Anil Ambani group's Reliance Infra and Power shares face a downturn, plummeting over 60% from their 52-week highs. ED seized assets worth ₹1,452 crores related to Reliance Communications. Despite recent drops, Reliance Infra shares surged 700% and Reliance Power saw a 1200% increase in five years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.