Airpace Industries : आज, (२० ऑगस्ट २०२५) रोजी एअरपेस इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. विशेष म्हणजे, २५ रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या शेअरने गेल्या ५ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य वाढून तब्बल ४२.४० लाख रुपये झाले असते. या शेअरने गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत ४२४०% चा परतावा दिला आहे. आज, बुधवारी, कंपनीचा शेअर २०.७१ रुपयांवर उघडला आणि ५% च्या वाढीसह २१.७० रुपयांवर पोहोचला.
एअरपेस इंडस्ट्रीजला यूएईच्या डिफेन्स कंपनीकडून LOI
आज एअरपेस इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला संयुक्त अरब अमिराती मधील एका प्रमुख संरक्षण (डिफेन्स) कंपनीकडून LOI (Letter of Intent) मिळालं आहे. या LOI मध्ये, यूएईच्या कंपनीने एअरपेसच्या आधुनिक डिफेन्स ड्रोनमध्ये मोठी स्वारस्य दाखवले आहे. या बातमीनंतर, एअरपेसचा शेअर ५% च्या अप्पर सर्किटला पोहोचला.
एअरपेस इंडस्ट्रीजने सांगितले की, यूएईचे अधिकारी लवकरच भारतात येऊन एअरपेसने बनवलेल्या ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक पाहतील. जर हे प्रात्यक्षिक समाधानकारक ठरले, तर यूएईची कंपनी त्यांच्या संरक्षणाच्या गरजांसाठी एअरपेसकडून ड्रोन खरेदी करण्याची योजना आखत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, कंपनीने अद्याप यूएईच्या त्या फर्मचे नाव उघड केले नाही.
एअरपेस इंडस्ट्रीजने स्पष्ट केले आहे की ते सौर ऊर्जा, डिफेन्स ड्रोन, शहरी हवाई वाहतूक आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांवर काम करत आहेत. कंपनीने सांगितले की ते लवकरच आपले प्रकल्प व्यावसायिक स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाचा - सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
कंपनीचा आर्थिक आढावा
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून १.७६ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत ०.९४ कोटी रुपये होता. मात्र, मार्च तिमाहीत झालेल्या ३.३ कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत तो कमी आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न १३.९१ लाख रुपये होते, जे मागील वर्षीच्या १०.९३ लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)