Lokmat Money >शेअर बाजार > अदानी ग्रुपचे मार्केट कॅप ६९,००० कोटी रुपयांनी वाढले; गुंतवणूकदार एकाच दिवसांत मालामाल...

अदानी ग्रुपचे मार्केट कॅप ६९,००० कोटी रुपयांनी वाढले; गुंतवणूकदार एकाच दिवसांत मालामाल...

Adani Shares: सेबीने अदानी समूहाला क्लीनचिट दिल्यामुळे अदानी समूहातील शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:43 IST2025-09-20T16:42:16+5:302025-09-20T16:43:59+5:30

Adani Shares: सेबीने अदानी समूहाला क्लीनचिट दिल्यामुळे अदानी समूहातील शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले.

Adani Shares: Adani Group's market cap increases by Rs 69,000 crore; Investors get rich in a single day | अदानी ग्रुपचे मार्केट कॅप ६९,००० कोटी रुपयांनी वाढले; गुंतवणूकदार एकाच दिवसांत मालामाल...

अदानी ग्रुपचे मार्केट कॅप ६९,००० कोटी रुपयांनी वाढले; गुंतवणूकदार एकाच दिवसांत मालामाल...

Adani Shares: भांडवली बाजार नियामक सेबीने अदानी समूह आणि त्यांचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. या सकारात्मक घडामोडीचा समूहाच्या सर्व शेअर्सवर सकारात्मक परिणाम झाला. शुक्रवारी अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. या वाढीमुळे समूहाच्या एकत्रित बाजार भांडवलात ₹६९,००० कोटींपेक्षा जास्त वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारदेखील मालामाल झाले. 

अदानी पॉवरचे शेअर्स १२.४० टक्क्यांनी वाढले
अदानी पॉवरचे शेअर्स शुक्रवारी १२.४० टक्क्यांनी वाढले. ट्रेडिंग दरम्यान शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. तर, अदानी टोटल गॅस ७.३५ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ५.३३ टक्के आणि अदानी एंटरप्रायझेस ५.०४ टक्के वाढले. अदानी एनर्जी सोल्युशन्समध्येही ४.७० टक्के वाढ झाली. तसेच, सांघी इंडस्ट्रीज १.४१ टक्के, एसीसी १.२१ टक्के, अदानी पोर्ट्स १.०९ टक्के आणि अंबुजा सिमेंट्स ०.२८ टक्के वाढले.

ग्रुपचे मार्केट कॅप ₹१३.९६ लाख कोटींवर पोहोचले
या मोठ्या वाढीमुळे सर्व ग्रुप कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप ₹१३.९६ लाख कोटींवर पोहोचले. अशाप्रकारे, मार्केट कॅपमध्ये एकाच दिवसात ₹६९,००० कोटींपेक्षा जास्त वाढ झाली. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने अदानी पॉवरवर खरेदीच्या शिफारसीचाही गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम झाला. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले की, सेबीने हिंडेनबर्ग चौकशीत ग्रुपला क्लीन चिट दिल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स वाढले. यामुळे ग्रुपवरील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे आणि ग्रुप कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Adani Shares: Adani Group's market cap increases by Rs 69,000 crore; Investors get rich in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.