Adani Group News: गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीनं क्लिन एनर्जी उत्पादन आणि वितरणासाठी दोन कंपन्या स्थापन केल्या आहेत. अदानी ग्रीन एनर्जीनं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी अदानी सोलर एनर्जी लिमिटेडनं गुजरातमध्ये दोन पूर्ण मालकीच्या उपकंपन्या अदानी हायड्रो एनर्जी थर्टीन (AHE13) आणि अदानी हायड्रो एनर्जी सिक्सटीन (AHE16) स्थापन केल्या आहेत. कंपनीनं म्हटलंयकी, AHE13L आणि AHE16L चे मुख्य उद्दिष्ट पवन ऊर्जा, सौर ऊर्जा किंवा इतर अक्षय स्रोतांमधून कोणत्याही प्रकारच्या विद्युत उर्जेचं उत्पादन, विकास, रूपांतर, वितरण, विक्री आणि पुरवठा करणं आहे.
शुक्रवारी शेअर्समध्ये मोठी घसरण
शुक्रवारी अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शेअर २.७९% घसरून ₹१,०२९.७५ वर बंद झाला. शेअरची ट्रेडिंग रेंज ₹१,०६२.६० आणि ₹१,०२९.७५ दरम्यान होती. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹१,४४५ होता आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ₹७५८ होता.
कसे होते तिमाही निकाल?
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर २८ टक्क्यांनी वाढून ₹६४४ कोटी झाला. मागील आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर कालावधीत, कंपनीनं ₹५१५ कोटींचा नफा नोंदवला होता. या कालावधीत, वीज पुरवठ्यातून कंपनीचं उत्पन्न ₹२,३०८ कोटींवरून ₹२,७७६ कोटी झालं. एकूण उत्पन्न ₹३,३९६ कोटींवरून ₹३,२४९ कोटींवर घसरलं. एकूण खर्च ₹२,८७४ कोटी होता, जो २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ₹२,८५७ कोटी होता.
३० सप्टेंबरपर्यंत, तिची ऑपरेटिंग क्षमता ४९ टक्क्यांनी वाढून १६.७ गिगावॅट झाली. कंपनी तिचं ५० गिगावॅट लक्ष्य साध्य करण्यासाठी नियोजनानुसार प्रगती करत आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
