Lokmat Money >शेअर बाजार > ५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..."

५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..."

Adani Energy Solutions shares: अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरलेत. आज, शुक्रवारी कंपनीचा शेअर घसरणीसह व्यवहार करत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:28 IST2025-02-21T13:24:32+5:302025-02-21T13:28:17+5:30

Adani Energy Solutions shares: अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरलेत. आज, शुक्रवारी कंपनीचा शेअर घसरणीसह व्यवहार करत होते.

Adani Energy Solutions shares fall by 50 percent now experts are giving buying advice said it will go Up to Rs 930 | ५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..."

५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..."

Adani Energy Solutions shares: अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स ऑगस्ट २०२४ च्या उच्चांकी १,३४७.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरले आहेत. आज, शुक्रवारी कंपनीचा शेअर घसरणीसह ६७५ रुपयांवर व्यवहार करत होते. ब्रोकरेज कंपन्या कंपनीच्या शेअर्समधील घसरणीला मोठी संधी म्हणत आहेत आणि ती खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. या शेअरवर एलारा सिक्युरिटीजनं 'बाय' रेटिंग दिलंय. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनीनं अदानी समूहाच्या या शेअरसाठी ९३० रुपयांचं टार्गेट ठेवलंय, जे ३७ टक्के वाढीचे संकेत देते.

काय आहेत डिटेल्स?

एलारा सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, अदानी एनर्जी सोल्यूशन्सचे ट्रान्समिशन एबिटा आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत दुप्पट होऊन ७,६०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. भारताचे रिन्यूएबल एनर्जीचं उद्दिष्ट ८४,००० कोटी रुपयांच्या नजीकच्या ट्रान्समिशन बोलीतील २० ते २५ बाजार हिस्सा आणि ५४,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्प पाइपलाइनद्वारे चालतं. "एईएसएलने स्मार्ट मीटर क्षेत्रात ही १७ टक्के मार्केट शेअरसह २३ दशलक्ष मीटरवर वर्चस्व कायम ठेवलं आहे आणि ८५ टक्के एबिटा मार्जिन कायम ठेवलंय. आम्ही एईएसएलवर बाय रेटिंग आणि ९३० रुपयांच्या एसओटीपी-आधारित टार्गेटसह सुरुवात करतो," असं एलारानं म्हटलं.

आर्थिक वर्ष २०१५ मध्ये क्यूआयपी झाल्यापासून अदानी एनर्जीनं ३८,८०० कोटी रुपयांचे पाच अतिरिक्त पारेषण प्रकल्प सुरक्षित केले आहेत. या नवीन प्रकल्पांमुळे ७ हजार कोटी रुपयांची वाढीव एबिटा मिळण्याची शक्यता आहे, जो आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत सध्याच्या ४ हजार कोटी रुपयांवरून सुमारे ७,६०० कोटी रुपयांपर्यंत प्रभावीपणे दुप्पट होईल. "प्रत्येक मीटर बसविण्यासाठी ५,८०० रुपयांच्या आगाऊ भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ९० महिन्यांच्या कराराच्या कालावधीत कंपनीला प्रति मीटर १२ हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कंपनी या वर्टिकलमध्ये ८५ टक्के एबिटडा मार्जिन राखण्यास तयार आहे," असंही एलारानं म्हटलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani Energy Solutions shares fall by 50 percent now experts are giving buying advice said it will go Up to Rs 930

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.