Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा

मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा

Multibagger stock : गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजार घसरत आहे. पण, या कमकुवत बाजार संकेतांमध्ये, एका मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळविण्याची संधी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:12 IST2025-12-30T11:08:10+5:302025-12-30T12:12:04+5:30

Multibagger stock : गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजार घसरत आहे. पण, या कमकुवत बाजार संकेतांमध्ये, एका मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळविण्याची संधी दिली आहे.

A-1 Ltd Bonus Issue and Stock Split Multibagger Stock Announces 3:1 Bonus and 10:1 Split | मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा

मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा

Multibagger stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या चार सत्रांपासून मंदीचे सावट असतानाही एका 'मल्टीबॅगर' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 'ए-१ लिमिटेड' या कंपनीने आपल्या शेअरधारकांसाठी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची दुहेरी मेजवानी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर सोमवारी बाजार घसरत असतानाही या शेअरने ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले.

बोनस आणि स्टॉक स्प्लिटची मेजवानी
कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ३:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ, ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचा १ शेअर आहे, त्यांना मोफत ३ बोनस शेअर्स मिळतील. याशिवाय, कंपनी आपल्या शेअर्सचे १० तुकड्यांत विभाजन देखील करणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • बोनस शेअर (३:१) : ३१ डिसेंबर २०२५
  • स्टॉक स्प्लिट (१०:१) : ८ जानेवारी २०२६

५ वर्षांत ३१००% परतावा; गुंतवणुकीचे झाले सोने!
ए-१ लिमिटेडचा परताव्याचा आलेख पाहिला तर तो थक्क करणारा आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात 'छप्परफाड' नफा मिळवून दिला आहे.

  • ५ वर्षांचा परतावा : सुमारे ३,१००% (गुंतवणूक ३१ पटीने वाढली).
  • १ वर्षाचा परतावा : ३५८.२८%
  • ६ महिन्यांचा परतावा : १७८.४०%

बीएसईवर शेअरची स्थिती
सोमवारच्या सत्रात ए-१ लिमिटेडचा शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह १,८४०.९० रुपयांवर बंद झाला. दिवसभरात शेअरने आपल्या वाढीची उच्च पातळी गाठली होती.

  • ५२ आठवड्यांचा उच्चांक : २,८१६.५५ रुपये.
  • ५२ आठवड्यांचा नीचांक : ३८५ रुपये.

गुंतवणुकीसाठी आकर्षण का वाढले?
स्टॉक स्प्लिटमुळे शेअरची दर्शनी किंमत कमी होते, परिणामी शेअरची बाजारातील किंमतही कमी होते. यामुळे लहान गुंतवणूकदारांना हा शेअर खरेदी करणे सोपे जाते आणि बाजारात शेअरची तरलता वाढते. बोनस आणि स्प्लिटच्या या 'कॉम्बो' ऑफरमुळे गुंतवणूकदारांमध्ये या शेअरविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

वाचा - पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : मंदी में भी A-1 लिमिटेड का धमाका, बोनस और स्टॉक स्प्लिट!

Web Summary : A-1 लिमिटेड ने बोनस शेयर (3:1) और स्टॉक स्प्लिट (10:1) की घोषणा की, जिससे बाजार में गिरावट के बावजूद शेयर में उछाल आया। शेयर ने 5 वर्षों में 3100% सहित शानदार रिटर्न दिया है, जिससे यह निवेशकों के लिए आकर्षक है।

Web Title : Multibagger A-1 Limited Announces Bonus, Stock Split; Shares Surge!

Web Summary : A-1 Limited announced bonus shares (3:1) and a stock split (10:1), driving its stock up despite market downturn. The stock has delivered impressive returns, including 3100% in 5 years, making it attractive to investors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.