Upcoming IPO : जर तुम्ही शेअर बाजारातगुंतवणूक करण्याची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! येणारा आठवडा गुंतवणूकदारांसाठी खूपच व्यस्त असणार आहे, कारण भारतीय शेअर बाजारात तब्बल ९ नवीन आयपीओ (IPO - Initial Public Offering) दाखल होणार आहेत. यामध्ये चार मेनबोर्ड आयपीओ आणि पाच एसएमई आयपीओ यांचा समावेश आहे.
या आठवड्यात जे मोठे आयपीओ येत आहेत, त्यात एगिस व्होपॅक टर्मिनल्स लिमिटेड (Aegis Vopak Terminals Ltd), श्लोस बंगळूरू लिमिटेड (Schloss Bengaluru Ltd - लीला हॉटेल्स), प्रोस्टारम इन्फो सिस्टम्स लिमिटेड (Prostaram Info Systems Ltd) आणि स्कोडा ट्यूब्स लिमिटेड (Skoda Tubes Ltd) या कंपन्यांचा समावेश आहे.
कोणता आयपीओ कधी येणार? तपशीलवार माहिती
एगिस व्होपॅक टर्मिनल्सचा आयपीओ:
हा आयपीओ २६ मे २०२५ रोजी उघडेल आणि २८ मे २०२५ रोजी बंद होईल. एगिस लॉजिस्टिक्सची ही उपकंपनी २,८०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. प्रति शेअर किंमत २२३ ते २३५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये ६३ शेअर्स असतील. कंपनीने आधीच अँकर गुंतवणूकदारांकडून १,२६० कोटी रुपये जमा केले आहेत.
लीला हॉटेल्स आयपीओ (श्लोस बंगळूरू लिमिटेड):
हा आयपीओ देखील २६ मे २०२५ रोजी उघडेल आणि २८ मे २०२५ रोजी बंद होईल. या आयपीओद्वारे सुमारे ३,५०० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यात २,५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि १,००० कोटी रुपयांचे ऑफर-फॉर-सेल (OFS) समाविष्ट आहे.
प्रोस्टारम इन्फो सिस्टम्स आयपीओ
हा आयपीओ २७ मे २०२५ रोजी सुरू होईल आणि २९ मे २०२५ रोजी बंद होईल. कंपनी १.६० कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून १६८ कोटी रुपये उभारणार आहे. प्रति शेअर किंमत ९५ ते १०५ रुपये असेल.
स्कोडा ट्यूब्स आयपीओ
हा आयपीओ २८ मे २०२५ रोजी उघडेल आणि ३० मे २०२५ रोजी बंद होईल. कंपनी भारतीय शेअर बाजारातून नवीन शेअर्स जारी करून २७५ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. प्राइज बेस १३० ते १४० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.
पाच एसएमई आयपीओ देखील येत आहेत!
मेनबोर्ड आयपीओसोबतच, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी (SME) असलेले पाच आयपीओ देखील याच आठवड्यात येत आहेत:
अॅस्टोना लॅब्सचा आयपीओ: २७ मे ते २९ मे २०२५, किंमत १२८ ते १३५ रुपये प्रति शेअर.
ब्लू वॉटर लॉजिस्टिक्स आयपीओ: २७ मे ते २९ मे २०२५, किंमत १३२ ते २३५ रुपये प्रति शेअर.
निकिता पेपर्स आयपीओ: २७ मे ते २९ मे २०२५, किंमत ९५ ते १०४ रुपये प्रति शेअर.
नेपच्यून पेट्रोकेमिकल्स आयपीओ: २८ मे ते ३० मे २०२५, किंमत ११५ ते १२२ रुपये प्रति शेअर (प्रत्येक लॉटमध्ये १,००० शेअर्स).
एनआर वंदना टेक्सटाईल आयपीओ: २८ मे ते ३० मे २०२५, किंमत ४२ ते ४५ रुपये प्रति शेअर.
या आठवड्यात येणाऱ्या या नऊ आयपीओमुळे गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे, तुम्हीही बाजारात एन्ट्री घेण्याचा विचार करत असाल, तर हे आयपीओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
वाचा - लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. ओयपीओमधील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)