Lokmat Money >शेअर बाजार > ९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स

९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स

9 IPOs Opened For the Investment: आज सोमवारपासून प्रायमरी मार्कट खूप व्यस्त असणार आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे IPO आज गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:09 IST2025-09-29T11:08:38+5:302025-09-29T11:09:31+5:30

9 IPOs Opened For the Investment: आज सोमवारपासून प्रायमरी मार्कट खूप व्यस्त असणार आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे IPO आज गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत.

9 companies ipo open for investment gmp list other details check before investing | ९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स

९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स

9 IPOs Opened For the Investment: आज सोमवारपासून प्रायमरी मार्कट खूप व्यस्त असणार आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे IPO आज गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत. या यादीत अनेक मोठ्या कंपन्यांची नावं देखील समाविष्ट आहेत. चला, त्या प्रत्येकाविषयी सविस्तर माहिती घेऊया:

मेनबोर्ड सेगमेंटचे IPO

१- Glottis IPO

  • कंपनीच्या IPO चा प्राईस बँड १२० रुपये ते १२९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
  • कंपनीने ११४ शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे.
  • यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) कमीतकमी १४७०६ रुपयांचा (१४७०६ रुपये) डाव लावावा लागेल.
  • हा IPO १ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील.
  • ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा IPO आज १२ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

२- Fabtech Technologies IPO

  • या कंपनीच्या IPO चा आकार २३०.३५ कोटी रुपये आहे.
  • IPO साठी प्राईस बँड १८१ रुपये ते १९१ रुपये प्रति शेअर निर्धारित करण्यात आला आहे.
  • कंपनीनं ७५ शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे.
  • या IPO ची किमान गुंतवणूक रक्कम १४३२५ रुपये आहे.
  • ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा IPO २० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.
  • ३- Om Freight Forwarders IPO

  • या कंपनीच्या IPO चा प्राईस बँड १२८ रुपये ते १३५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
  • कंपनीने १११ शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे.
  • यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना कमीतकमी १४९८५ रुपयांची बोली लावावी लागेल.
  • आज सोमवारी ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा IPO ११ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.
     

शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत

एसएमई सेगमेंटचे IPO

१- Sodhani Capital IPO

  • IPO चा आकार १०.७१ कोटी रुपये आहे.
  • कंपनी IPO द्वारे १७ लाख फ्रेश शेअर्स जारी करेल.
  • IPO चा प्राईस बँड ५१ रुपये आहे.
  • लॉट साईज २००० शेअर्सचा तयार करण्यात आला आहे.
  • कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला कमीतकमी २,०४,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
  • आज या IPO चा GMP शून्य रुपये आहे.

२- Vijaypd Ceutical IPO

  • कंपनीच्या IPO चा प्राईस बँड ३५ रुपये आहे.
  • कंपनी ४००० शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे.
  • गुंतवणूकदारांना कमीतकमी २ लॉटवर एकाच वेळी बोली लावावी लागेल.
  • IPO १ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील.
  • या IPO चा GMP देखील शून्य रुपयेच आहे.

३- Om Metallogic IPO

  • हा IPO १ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील.
  • गुंतवणूकदारांसाठी कंपनीने ८६ रुपये प्रति शेअर प्राईस बँड घोषित केला आहे.
  • या एसएमई सेगमेंटच्या IPO चा लॉट साईज १६०० शेअर्सचा आहे.
  • कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला कमीतकमी २ लॉट एकाच वेळी सबस्क्राइब करावे लागतील.
  • कंपनीच्या IPO चा सध्याचा GMP १८ रुपये प्रति शेअर आहे.

४- Suba Hotels IPO

  • कंपनीच्या IPO चा प्राईस बँड १०५ रुपये ते १११ रुपये प्रति शेअर आहे.
  • IPO चा लॉट साईज १२०० शेअर्सचा आहे.
  • यामुळे गुंतवणूकदारांना कमीतकमी २,६६,४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
  • कंपनीच्या IPO चा सध्याचा GMP ७ रुपये आहे.

५- Dhillon Freight Carrier IPO

  • एसएमई सेगमेंटमधील या IPO चा प्राईस बँड ७३ रुपये आहे.

  • कंपनीने १६०० शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे.
  • गुंतवणूकदारांना कमीतकमी ३२०० शेअर्सवर (२ लॉट) एकाच वेळी गुंतवणूक करावी लागेल.
  • ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा IPO आज १२ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

६- Chiraharit IPO

  • कंपनीने IPO साठी ६००० शेअर्सचा एक लॉट तयार केला आहे.
  • किरकोळ गुंतवणूकदारांना एकाच वेळी १२००० शेअर्समध्ये (२ लॉट) गुंतवणूक करावी लागेल.
  • IPO चा प्राईस बँड २१ रुपये प्रति शेअर निर्धारित करण्यात आला आहे.
  • IPO चा GMP शून्य रुपये आहे.


(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : नौ कंपनियों के IPO आज से खुले; क्या आपको निवेश करना चाहिए? विवरण यहाँ।

Web Summary : आज नौ कंपनियों ने अपने IPO लॉन्च किए, जिनमें मेनबोर्ड और SME सेगमेंट शामिल हैं। ग्लॉटिस, फैबटेक और ओम फ्रेट प्रमुख मेनबोर्ड IPO हैं। सोधनी कैपिटल, विजयपीडी सेयुटिकल और ओम मेटालॉजिक SME IPO में शामिल हैं। निवेश से पहले निवेशकों को विशेषज्ञों से सलाह लेनी चाहिए।

Web Title : Nine companies launch IPOs today; should you invest? Details here.

Web Summary : Nine companies launched their IPOs today, spanning mainboard and SME segments. Glottis, Fabtech, and Om Freight are key mainboard IPOs. Sodhani Capital, Vijaypd Ceutical, and Om Metallogic are among the SME IPOs. Investors should consult experts before investing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.