Lokmat Money >शेअर बाजार > ४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

TCS Share Market Cap: कंपनीचे शेअर्स तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. तसंच कंपनीला मोठा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:53 IST2025-09-26T13:51:22+5:302025-09-26T13:53:50+5:30

TCS Share Market Cap: कंपनीचे शेअर्स तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. तसंच कंपनीला मोठा फटका बसला आहे.

4 lakh crores lost tcs TATA gave a big shock to investors can the price go down further | ४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

TCS Share Market Cap: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या (TCS) शेअर्समध्ये आजही घसरण झाली आहे. टाटा ग्रुपच्या या कंपनीचा शेअर बीएसई (BSE) वर १.४% घसरणीसह २,९१६ रुपयांवर आला. ही त्याची ३ वर्षांतील नीचांकी पातळी आहे. यासोबतच कंपनीचं मार्केट कॅप १०.५७ लाख कोटी रुपये झालंय. यावर्षी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

मागणी कमी होणं, अमेरिकेमध्ये H-1B व्हिसा शुल्क वाढणं आणि जनरेटिव्ह एआयचा (Generative AI) वापर वाढल्यामुळे कंपनीवर परिणाम झाला आहे. यासोबतच, कंपनीची तिमाही कामगिरीही चांगली राहिली नाही. या सर्व गोष्टींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे.

लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?

मार्केट कॅप घसरलं

टीसीएसचं मार्केट कॅप मागील सत्रात १०.७१ लाख कोटी रुपये होते, जे ३१ डिसेंबर २०२४ रोजी १४.८१ लाख कोटी रुपये होते. यावर्षी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये २८% नी घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक ३०% पर्यंत घसरलाय. या आयटी शेअरच्या भागधारकांना गेल्या तीन वर्षांपासून नुकसान होत आहे. जर कोणी तीन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक कोटी रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य ९५ लाख रुपये झालं असतं. सहा महिन्यांत स्टॉक १९% आणि तीन महिन्यांत १४% पर्यंत घसरलाय.

किंमत कुठपर्यंत घसरेल?

टेक्निकल चार्ट्सनुसार, याचा आर.एस.आय. (RSI) ३३ च्या जवळपास पोहोचला आहे. याचा अर्थ स्टॉक ओव्हरसोल्ड झोनमध्ये (Oversold Zone) ट्रेड करत आहे. जाणकारांचे म्हणणं आहे की याला २९०० रुपयांवर सपोर्ट मिळेल आणि ३,१०० रुपयांवर रेझिस्टन्स मिळेल. जर स्टॉक ३,१०० रुपयांची पातळी ओलांडून गेला, तर तो ३१५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंगची रेंज २,९०० रुपये ते ३,१५० रुपयांदरम्यान राहील.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : TATA के TCS शेयर में भारी गिरावट, निवेशकों को ₹4 लाख करोड़ का नुकसान

Web Summary : TCS के शेयर 3 साल के निचले स्तर पर, बाजार पूंजीकरण में ₹4 लाख करोड़ की गिरावट। मांग में कमी, अमेरिकी वीजा लागत में वृद्धि और एआई अपनाने जैसे कारण हैं। विशेषज्ञों ने ₹2,900 और ₹3,150 के बीच ट्रेडिंग रेंज का अनुमान लगाया है।

Web Title : TATA's TCS Share Plummets, Investors Suffer ₹4 Lakh Crore Loss

Web Summary : TCS shares hit a 3-year low, eroding ₹4 lakh crore in market cap this year. Factors include reduced demand, rising US visa costs, and AI adoption. Experts predict a trading range between ₹2,900 and ₹3,150.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.