Lokmat Money >शेअर बाजार > ३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का?

३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का?

Bonus Stock: शेअर बाजारात आज तीन कंपन्या एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:30 IST2025-01-17T09:30:00+5:302025-01-17T09:30:00+5:30

Bonus Stock: शेअर बाजारात आज तीन कंपन्या एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स.

3 companies will trade ex-bonus today, penny stocks also on the list; do you have any? | ३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का?

३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का?

Bonus Stock: शेअर बाजारात आज तीन कंपन्या एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहेत. यात किटेक्स गारमेंट्स लिमिटेड नावाची कंपनीही आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या कंपन्या आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

किटेक्स गारमेंट्स लिमिटेड

कंपनी आज शेअर बाजारात एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत आहे. कंपनी एका शेअरवर २ शेअर्स बोनस म्हणून देत आहे. कंपनी दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. यापूर्वी किटेक्स गारमेंट्स लिमिटेडने २०१७ मध्ये बोनस शेअर्स दिले होते. त्यानंतर कंपनीनं ५ शेअरवर २ शेअर बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १.६७ टक्क्यांनी घसरून ६९८.४० रुपयांवर व्यवहार करत होता.

सत्त्व सुकुन लाइफकेअर लि.

या पेनी स्टॉकनं बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. बीएसईच्या आकडेवारीनुसार या कंपनीने ५ शेअरवर २ शेअर्स बोनस देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीनं शेअर्सची विभागणी केली होती. ज्यानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ५ रुपयांवरून १ रुपयांवर आली. गुरुवारी कंपनीच्या शेअरचा भाव २.२० रुपये प्रति शेअर होता.

कोरे डिजिटल लिमिटेड

ही कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देत आहे. कंपनीच्या वतीनं एका शेअरवर २ शेअर्स बोनस दिले जात आहेत. ज्याची विक्रमी तारीख आज निश्चित करण्यात आली आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर्सना लोअर सर्किटचा फटका बसला. त्यानंतर एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचा भाव ५ टक्क्यांनी घसरून १५३१.७५ रुपयांवर आला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २८५६.१५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ७४२.५० रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 3 companies will trade ex-bonus today, penny stocks also on the list; do you have any?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.