UKB Electronics IPO: भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा (EMS) प्रदाता कंपनी UKB इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) दाखल केला आहे. कंपनी इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे (IPO) ८०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. ही कंपनी २००४ मध्ये अस्तित्वात आली होती. या अर्थानं, कंपनीनं २१ वर्षे पूर्ण केली आहेत.
आयपीओची माहिती काय?
प्रस्तावित आयपीओमध्ये ४०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करणं आणि विद्यमान भागधारकांकडून ४०० कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (ओएफएस) समाविष्ट आहे. कंपनीनं आयपीओचा एक भाग पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला आहे आणि कर्मचारी आरक्षण कोट्याअंतर्गत त्यांना ऑफर किंमतीवर सूट देखील देऊ शकते.
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
पैसे कुठे खर्च करणार?
यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स नवीन इश्यूमधून मिळणारं निव्वळ उत्पन्न प्रामुख्यानं काही थकित कर्जांची परतफेड, प्लांट खरेदी, त्यांच्या विद्यमान उत्पादन सुविधांसाठी यंत्रसामग्री आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरेल. ही रक्कम कंपनीच्या ऑपरेशनल कौशल्यांना बळकटी देण्यासाठी आणि भविष्यातील वाढीच्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई वर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून काम करत आहेत.
कंपनीबद्दल अधिक माहिती
ईएमएस कंपनी म्हणून स्थापन झालेली, यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स ही भारतातील काही मोजक्या स्थानिक कंपन्यांपैकी एक आहे ज्यांच्याकडे उत्पादन डिझाइन आणि प्रोटोटाइपिंगपासून ते इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल बांधकामापर्यंत क्षमता आहेत. १७० जागतिक उत्पादन प्रमाणपत्रांसह, कंपनी सध्या १७ देशांमध्ये निर्यात करते. कंपनीकडे महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगर, उत्तर प्रदेशातील नोएडा, राजस्थानातील घिलोथ, गोवा, आंध्र प्रदेशातील श्री सिटी आणि तामिळनाडूतील चेन्नई येथे ११ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)