Lokmat Money >शेअर बाजार > ₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का?

₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का?

Bodhi Tree Share Price : शेअर बाजारात कामकाजादरम्यान मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १२०० अंकांपर्यंत घसरण झाली. मात्र, बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:49 IST2025-01-06T13:49:13+5:302025-01-06T13:49:13+5:30

Bodhi Tree Share Price : शेअर बाजारात कामकाजादरम्यान मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १२०० अंकांपर्यंत घसरण झाली. मात्र, बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन सुरूच आहे.

20 percent upper circuit in rs12 Bodhi Tree Penny Stock Investors have got 650 percent profit do you have it | ₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का?

₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का?

Bodhi Tree Share Price : शेअर बाजारात कामकाजादरम्यान मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १२०० अंकांपर्यंत घसरण झाली. मात्र, बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन सुरूच आहे. दरम्यान, बोधी ट्री मल्टिमीडिया लिमिटेड (Bodhi Tree Multimedia Limited Stock Price) या मायक्रोकॅप कंपनीच्या शेअर्सनं अपर सर्किटला धडक दिली आहे. गेल्या वर्षभरापासून पेनी शेअर्सनं निगेटिव्ह परतावा दिलाय. मात्र पुन्हा एकदा यात मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येत आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

२० टक्क्यांचं अपर सर्किट

सोमवारी कंपनीच्या शेअर्सना (bodhi tree multimedia ltd) २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. आज ११.९२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला आणि याच लेव्हलवर शेअरला अपर सर्किट लागलं. या मल्टिबॅगर पेनी शेअरनं पाच वर्षांच्या दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला असला तरी गेल्या वर्षभरापासून त्यात घसरण होत आहे.

वर्षभरापासून घसरण

बोधी ट्री मल्टिमीडिया लिमिटेडचे शेअर्स गेल्या महिन्याभरात जवळपास २ टक्क्यांनी घसरले आहेत, तर ६ महिन्यांच्या कालावधीत १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. याशिवाय एका वर्षात त्यात ४० टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे, तर पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना या शेअरनं ६६५ टक्क्यांचा नफा मिळवून दिलाय.

या पेनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर २२.१९ रुपये आहे आणि  ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ९.४० रुपये आहे. कंपनीचं बाजार भांडवल १४८.९५ कोटी रुपये आहे. त्याचवेळी याचा पीई रेश्यो ७०.११ आहे, जे त्याच्या शेअरच्या किमतीच्या तुलनेत खूप जास्त आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 20 percent upper circuit in rs12 Bodhi Tree Penny Stock Investors have got 650 percent profit do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.