Mutual Fund Houses Favorite Stocks: आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत म्युच्युअल फंड सातत्यानं आपले पोर्टफोलिओ अॅडजस्ट करताना दिसून आले आहेत. या दरम्यान म्युच्युअल फंड हाऊसेसनं बाजारातील अनेक लार्ज कॅप शेअर्समध्ये आपला हिस्सा अतिशय वेगाने वाढवला आहे. स्टॉक एजच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर तिमाहीत असे १० शेअर्स दिसून आले आहेत ज्यात म्युच्युअल फंड हाऊसेसनं सर्वाधिक हिस्सा वाढवलाय. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स.
Axis Bank - आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीत अॅक्सिस बँकेत म्युच्युअल फंड हाऊसचा हिस्सा २५.६ टक्के होता, जो डिसेंबर तिमाहीतील ३.४ टक्क्यांवरून आणखी वाढला आहे. त्यामुळे डिसेंबर तिमाहीअखेर अॅक्सिस बँकेतील म्युच्युअल फंडांचा हिस्सा २९.०३ टक्क्यांवर आला.
CIPLA - डिसेंबर तिमाहीच्या अखेरीपासून सिप्लाच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडाचा हिस्सा २०.४६ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो गेल्या सप्टेंबर तिमाहीत १७.४८ टक्के होता.
Zomato - आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत झोमॅटोच्या शेअर्समधील म्युच्युअल फंडांचा वाटा २.९% वरून १६.४२% पर्यंत वाढला आहे. जो सप्टेंबर तिमाहीत १३.५७ टक्के होता.
SBI Life Insurance - आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांनी आपला हिस्सा २.६ टक्क्यांनी वाढवलाय. अशा प्रकारे म्युच्युअल फंडांचा हिस्सा आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील १२.१९% वरून आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १४.७९% पर्यंत वाढला.
PNB - आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेतील म्युच्युअल फंड हाऊसेसचा हिस्सा २.५% वरून ५.३६% पर्यंत वाढला. जो सप्टेंबर तिमाहीच्या दुसऱ्या तिमाहीत २.८७ टक्के होता.
Mahindra & Mahindra - महिंद्रा अँड महिंद्रामधील म्युच्युअल फंडांचा हिस्सा आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत २.१ टक्क्यांनी वाढून १४.९८ टक्के झाला आहे, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीत १२.९२ टक्के होता.
Eicher Motors - आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत ऑटो कंपनी आयशर मोटर्समधील म्युच्युअल फंडांचा हिस्सा १.८ टक्क्यांनी वाढला आहे. म्युच्युअल फंडांचा हिस्सा सप्टेंबर तिमाहीतील ९.५२ टक्क्यांवरून डिसेंबर तिमाहीत ११.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Trent - आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत ट्रेंट कंपनीतील म्युच्युअल फंडांचा हिस्सा १.७ टक्क्यांची वाढलाय. त्यामुळे ट्रेंट कंपनीतील म्युच्युअल फंडाचा हिस्सा सप्टेंबर तिमाहीतील ९.३३ टक्क्यांवरून डिसेंबर तिमाहीत ११ टक्क्यांवर पोहोचला.
Hero Motocorp - म्युच्युअल फंड हाऊसेसनं ऑटो स्टॉक हीरो मोटोकॉर्पमध्ये रस दाखवला असून आकडेवारीनुसार, डिसेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडांचा हिस्सा १.६ टक्क्यांनी वाढलाय. त्यामुळे डिसेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडांचा हिस्सा १६.१२ टक्क्यांवर आला. जो सप्टेंबर तिमाहीत १४.५७ टक्के होता.
Varun Beverages - आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत वरुण बेव्हरेजेस कंपनीतील म्युच्युअल फंडाचा हिस्सा १.५ टक्क्यांनी वाढून ४.०८ टक्क्यांवर आला. हा हिस्सा सप्टेंबर तिमाहीत २.६३ टक्क्यांवर होता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)