Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती

म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती

US-India Trade Relationship : डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक राजकारणाच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता.

By बाळकृष्ण परब | Published: March 2, 2021 04:18 PM2021-03-02T16:18:45+5:302021-03-02T16:20:23+5:30

US-India Trade Relationship : डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक राजकारणाच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता.

So the Biden administration is upset over the Modi government's 'Make in India' | म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती

म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती

वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक राजकारणाच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. (US-India Trade Relationship) मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया या मोहिमेवर आणि व्यापारी धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (So the Biden administration is upset over the Modi government's 'Make in India')
 
यूएसचीआरच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. बायडन प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसला सांगितले की, भारताकडून मेक इन इंडिया मोहिमेला देण्यात येणारे प्रोत्साहन अमेरिका आणि भारतामधील द्विपक्षीय व्यापारामधील मोठ्या आव्हानाला दर्शवणारे आहे.  २०२१ साठी व्यापार धोरणावर आलेल्या रिपोर्टमध्ये यूएस ट्रेड रिप्रेंझेटेटिव्ह (यूएसटीआर) यांनी सांगितले की, २०२० मध्ये अमेरिकेकडून भारतीय बाजारामध्ये पोहोचण्याशी संबंधित मुद्द्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू राहिले. यूएसटीआर यांनी सांगितले की, भारताच्या व्यापार धोरणांमुळे अमेरिकी निर्यातदारांवर परिणाम झाला आहे. 

यूएसटीआर ने सोमवारी काँग्रेसला सोपवण्यात आलेल्या अहवालामध्ये सांगितले की, भारताने आपला मोठा बाजार, आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या सर्व संधींमुळे सर्व अमेरिकी निर्यातदारांसाठी आवश्यक बाजार बनला आहे. मात्र भारताच्या व्यापाराला मर्यादित करण्याच्या धोरणामुळे दोन्ही देशांमधील व्यापारिक संबंधांबाबत असलेली शक्यता कमकुवत होत चालली आहे. भारताकडून मेक इन इंडिया कँपेनच्या माध्यमातून आयात कमी करण्यावर जोर देणे आमच्या द्विपक्षीय व्यापारी संबंधांसमोरील आव्हाने दर्शवते. 

५ जून २०१९ मध्ये अमेरिकेने भारतासाठी जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रिफरेंसेस (जीएसपी) अंतर्गत व्यापारामध्ये मिळणारी विशेष सूट कमी करण्यात आली होती. भारताला जीएसपीच्या फायद्यांपासून वंचित केल्यानंतर अमेरिकेने भारतासोबत बाजारामधील पोहोच आणि त्याच्या नियमांबाबत चर्चा केली. २०२० मध्येही दोन्ही देशांमध्ये या मुद्द्यावरून चर्चा झाली होती. 

मिळत असलेल्या माहितीनुसार भारताने अनेक टेरिफमध्ये कपात करून बाजारामधील अमेरिकी कंपन्यांची पोहोच अधिक सुलभ करावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. तसेच गैर-टॅरिफ बॅरियर्सबाबतसुद्धा काही विवाद आहेत. अमेरिकेने २०२०मध्ये द्विपक्षीय व्यापाराच्या सर्व मुद्द्यांबाबत आपल्या चिंता भारतासमोर मांडली होती. यामध्ये बौद्धिक संपदा, सुरक्षा आणि क्रियान्वयन, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आणि डिजिटल व्यापाराला प्रभावित करणारी धोरणे आणि कृषी आणि बिगर-कृषी उत्पादनांची बाजारीमधील आवक याबाबतच्या मुद्द्यांचा समावेश होता. 

यूएसटीआरच्या रिपोर्टनुसार ब्रिटन अमेरिकी सेवांच्या आयातीच्याबाबतीत अव्वलस्थानी आहे. ब्रिटनने २०१९ मध्ये अमेरिकेकडून ६२ अब्ज डॉलर किमतीची सेवा घेतली होती. तर भारत २९.७ अब्ज डॉलरसह या यादीत कॅनडा (३८.६ अब्ज डॉलर), जपान (३५.८ अब्ज डॉलर), जर्मनी (३४.९ अब्ज डॉलर) आणि मेक्सिको (२९.८ अब्ज डॉलर) यांच्यापाठोपाठ सहाव्या क्रमांकावर राहिला. यूएसटीआरने सांगितले की, जुलै २०२० मध्ये अमेरिकेच्या आक्षेपानंतर भारताने लॅक्टोज आणि व्हे प्रोटिन आणणाऱ्या जहाजांना मुक्त केले होते. भारताने एप्रिल २०२०मध्ये उत्पादनांसह डेअरी सर्टिफिकेट अनिवार्य केली होती. त्यानंतर अनेक अमेरिकी शिपमेंट रोखण्यात आले होते. 

Web Title: So the Biden administration is upset over the Modi government's 'Make in India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.