Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jack Ma: टीका भोवली! जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड

Jack Ma: टीका भोवली! जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड

jack ma: चीन सरकारने जॅक मा यांच्या अलिबाबा या कंपनीतील व्यवहारांची चौकशी सुरू केली असून, मोठी कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:41 PM2021-04-10T13:41:29+5:302021-04-10T13:44:45+5:30

jack ma: चीन सरकारने जॅक मा यांच्या अलिबाबा या कंपनीतील व्यवहारांची चौकशी सुरू केली असून, मोठी कारवाई केली आहे.

setback for jack ma chinese regulators slap record 2 8 billion doller fine on alibaba | Jack Ma: टीका भोवली! जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड

Jack Ma: टीका भोवली! जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड

Highlightsजॅक मा यांच्या अलिबाबा कंपनीवर मोठी कारवाईचीन सरकार आणि शी जिनपिंग यांच्यावरील टीका भोवलीबाजारपेठेतील विश्वासार्हतेचा दुरुपयोग केल्याचा ठपका

बीजिंग: जगातील प्रमुख उद्योजक अब्जाधीशांपैकी एक असलेले जॅक मा यांना आता शी जिनपिंग आणि चीन सरकारवर टीका करणे चांगलेच महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे. चीन सरकारने जॅक मा यांच्या अलिबाबा या कंपनीतील व्यवहारांची चौकशी सुरू केली असून, मोठी कारवाई केली आहे. चीन सरकारने जॅक मा यांच्या अलिबाबा कंपनीला तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. (setback for jack ma chinese regulators slap record 2 8 billion doller fine on alibaba)

चीन सरकारची धोरणे आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांनी टीका केली होती. यानंतर जॅक मा काही काळ अज्ञातवासात होते. त्यानंतर चिनी सरकारने जॅक मा यांच्या अलिबाबा कंपनीवर फास आवळायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलिबाब कंपनीवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. अलिबाबावर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जाते.

भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख

बाजारपेठेतील विश्वासार्हतेचा दुरुपयोग

अलिबाब ग्रुपने एकाधिकारविरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याशिवाय बाजारपेठेत आपल्या विश्वासार्हतेचाही दुरुपयोग केला आहे. त्यामुळेच कंपनीला २.७५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही रक्कम वर्ष २०१९ मध्ये अलिबाबा कंपनीच्या महसुलाच्या चार टक्के इतकी आहे. 

परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे

सार्वजनिक जीवनातून जॅक मा अज्ञातवासात

चीन सरकारच्या धोरणावर टीका केल्यानंतर जॅक मा हे तब्बल सहा महिने अज्ञातवासात होते. ऑक्टोबर २०२० पासून सार्वजनिक जीवनातून जॅक मा विजनवासात गेले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात जॅक मा एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाल्याचा दावा चीनमधील माध्यमांनी केला होता.

मोदींच्या लोकप्रियतेमुळे तृणमूलचा पराभव निश्चित! प्रशांत किशोर यांनी केले मान्य; मालवीय यांचा दावा

दरम्यान, चीनची वित्तीय व्यवस्था अत्यंत जुन्या उद्योगावर आधारित आहे. नव्या पिढीसाठी यात निश्चितच बदल केले पाहिजेत, असे जॅक मा म्हणाले होते. जॅक मा यांच्या 'अँट' कंपनीच्या आयपीओला चीनच्या प्राधिकरणाकडून हिरवा कंदील मिळाला होता. पण या भाषणानंतर काही आठवड्यातच त्याचा परवाना रद्द करण्यात आला. 
 

Web Title: setback for jack ma chinese regulators slap record 2 8 billion doller fine on alibaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.