Stock Market: जागतिक पातळीवर घडलेल्या २ मोठ्या घटनांनी भारतीय शेअर बाजार आज रॉकेट झाला. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घोषित झाला, तर आज अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध शमलं. या दोन्ही घटनानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. १२ मे रोजी, निफ्टीने ३ वर्षातील सर्वात मोठी इंट्रा-डे वाढ पाहिली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४% पेक्षा जास्त वाढले. बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. आयटी निर्देशांकात गेल्या ५ वर्षांतील सर्वात मोठी इंट्रा-डे तेजी दिसून आली. धातू, रिअल्टी आणि ऊर्जा निर्देशांकांमध्ये चांगली वाढ दिसून आली. निफ्टी बँक आणि ऑटो निर्देशांक ३% पेक्षा जास्त वाढून बंद झाले. एफएमसीजी निर्देशांक सुमारे २.५% ने वाढून बंद झाला. एकंदरीत शेअर बाजारात आज
फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स आणि निफ्टी एकाच दिवसात ४% वाढीसह बंद झाले आहेत. आजच्या वाढीसह, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात १६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. यासह, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे. या वाढीसह, निफ्टी आणि सेन्सेक्स आता ७ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, जे २०२५ मधील सर्वोच्च पातळी आहे. टॅरिफ निर्णयानंतर आयटी आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी आयटीमध्ये ७% पेक्षा जास्त वाढ झाली, जी गेल्या ५ वर्षांतील निर्देशांकासाठी सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टीमधील ५० पैकी ४८ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. यामध्ये १-८% वाढ झाली.
बाजारात आज काय घडलं?
सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर, सेन्सेक्स २,९७५ अंकांच्या वाढीसह ८२,४३० वर बंद झाला. निफ्टी ९१७ अंकांच्या वाढीसह २४,९२५ वर बंद झाला. निफ्टी बँक १,७८८ अंकांच्या वाढीसह ५५,३८३ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक २,१९३ अंकांनी वाढून ५५,४१६ वर बंद झाला.
कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
हॉटेल आणि पर्यटन समभागांमध्ये मोठी खरेदी दिसून आली. इंडियन हॉटेल्स आणि इंडियागोमध्ये ७-७% वाढ झाली. निफ्टीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या समभागांच्या यादीत इन्फोसिस, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ट्रेंट आणि विप्रो हे शीर्षस्थानी होते. निफ्टीमधून फक्त इंडसइंड बँक आणि सन फार्मा लाल रंगात बंद झाले.
वाचा - पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
मिडकॅप सेगमेंटमधून, बिर्लासॉफ्ट, हिंद कॉपर, एस्कॉर्ट्स, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस, एसजेव्हीएन, सेल आणि एनबीसीसी हे आज सर्वाधिक तेजीत होते. सोलर इंडस्ट्रीज आणि एचएएल सारख्या संरक्षण समभागांमध्ये वाढ दिसून आली.