Sensex slumped 307 points | Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला 
Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला 

मुंबई - भारतीय शेअर बाजारामध्ये आजही मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून,  सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 307 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे सेंसेक्स गेल्या पाच महिन्यांतील सर्वात निचांकावर पोहोचला आहे. दरम्यान, आज रुपयाच्या मूल्यामध्येही घसरण दिसून आली असून, एक डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.03 पर्यंत घसरले आहे. 

दरम्यान,  गुरुवारीसुद्धा शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. तसेच रुपयाही खूप गडगडला होता. ही पडझड होत असतानाच सोन्याचा दर मात्र वाढला. गुरुवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ३६,४७२.९३ अंकावर खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७७.३५ अंकांनी घसरून १०,७४१.३५ अंकावर बंद झाला होता. रुपयाही २६ पैशांनी घसरल्याने एक डॉलरची किंमत ७१.८१ रुपये झाली होती. हा रुपयाचा आठ महिन्यांचा नीचांक ठरला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोने १५० रुपयांनी वाढून ३८,९७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले तर चांदीही ६० रुपयांनी वाढून ४५,१०० रुपये किलो झाली होती.

English summary :
Share Market Crash Today (23 August 2019): The Indian stock market has fallen sharply today, with the Sensex falling 307 points after opening the morning market. Therefore, the Sensex has reached its lowest level. Meanwhile, the rupee has also fallen in value today (23 August 2019).


Web Title: Sensex slumped 307 points
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.