lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स धडाम! गुंतवणूकदारांना बजेटची चिंता; बाजार 956.66 अंकांनी कोसळला

सेन्सेक्स धडाम! गुंतवणूकदारांना बजेटची चिंता; बाजार 956.66 अंकांनी कोसळला

Sensex crashed : पुढील आठवड्यात केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. परंतू, गुंतवणूकदारांना बजेटपूर्व चिंतेने ग्रासल्याने आणि नफेखोरी सुरु झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 03:14 PM2021-01-27T15:14:57+5:302021-01-27T15:27:33+5:30

Sensex crashed : पुढील आठवड्यात केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. परंतू, गुंतवणूकदारांना बजेटपूर्व चिंतेने ग्रासल्याने आणि नफेखोरी सुरु झाली.

Sensex crashed by 956.66 points; pre Budget concerns, profit making of investors | सेन्सेक्स धडाम! गुंतवणूकदारांना बजेटची चिंता; बाजार 956.66 अंकांनी कोसळला

सेन्सेक्स धडाम! गुंतवणूकदारांना बजेटची चिंता; बाजार 956.66 अंकांनी कोसळला

पुढील आठवड्यात केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. परंतू, गुंतवणूकदारांना बजेटपूर्व चिंतेने ग्रासल्याने आणि नफेखोरी सुरु झाल्याने आज सेन्सेक्स जवळपास 956.66 अंकांनी कोसळला आहे. गेल्या चार दिवसांपासून सेन्सेक्सची घसरगुंडी काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या चार दिवसांक सेन्सेक्स 2,350 अंकांनी घसरला आहे. निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. 


गुंतवणूकदारांनी नफेखोरीसाठी विक्रीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्सवर दबाव आला. यामुळे सेन्सेक्स कोसळल्याचे जाणकारांचे मत आहे. निफ्टीमध्येही 2 टक्क्यांची घसरण झाली असून 13950 वर आहे, आज सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. बाजार बंद होतेवेळी सेन्सेक्स 956.66 अंकांनी कोसळून 47,390.93 वर स्थिरावला आहे. जवळपास सर्व बँकांचे शेअर कोसळले आहेत. 

 
२१ जानेवारीला सेन्सेक्सने 50181 ची पातळी गाठली होती. मात्र, त्यानंतर लगेचच शेअर बाजारात पडझड सुरु झाली. गेल्या चार दिवसांपासून ही पडझड सुरुच आहे. दरम्यान, युरोपमध्येही सेन्सेक्समध्ये घसरण झाली आहे. MSCI मध्ये 49 देशांच्या कंपन्यांचे शेअर ट्रॅक केले जातात. या स्टॉक एक्स्चेंजमध्ये आज 0.1 टक्क्यांची घसरण झाली. 

64% शेअर पडले
बीएसईवर 2,987 कंपन्यांचे शेअर लिस्टेड आहेत. यापैकी 918 शेअर वाढलेले आहेत, तर 1930 शेअर घसरलेले आहेत. म्हणजेच एक्स्चेंजवर 64 टक्के शेअर लाल निशान्यावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पडझडीमुळे लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट 189.31 लाख कोटी झाले आहे. NSE चा निफ्टीदेखील 304 अंकांनी घसरला असून 13,934.70 वर आहे. टाटा मोटर्स आणि डॉ. रेड्डीजचे शेअर सर्वाधिक पडले आहेत. तर विप्रो, एसबीआय लाईफच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. रिलायन्स, बजाज फायनान्स TCS, HDFC च्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 
 

सोन्यामध्येही मोठी घसरण...

आज सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. सोमवारी 49,143 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेले सोने आज 323 रुपयांनी घसरले. 48,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडलेले सोने आज 48810 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाले आहे. दुसरीकडे जसा सोन्याचा हाल आहे तसाच चांदीचाही झाला आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसू लागली आहे. सोमवारी चांदी 66,535 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज चांदी 304 रुपयांच्या घसरणीने सुरु झाली. चांदीने सुरुवातीला 66,045 रुपये प्रति किलोचा दर गाठला होता. सध्या चांदी 352 रुपयांनी घसरली आहे. 

Web Title: Sensex crashed by 956.66 points; pre Budget concerns, profit making of investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.