Lokmat Money > बिझनेस न्यूज > Air India: विक्रम देव दत्त यांच्या गळ्यात 'एअर इंडिया'च्या चेअरमनपदाची माळ, सरकारचा मोठा निर्णय!

Air India: विक्रम देव दत्त यांच्या गळ्यात 'एअर इंडिया'च्या चेअरमनपदाची माळ, सरकारचा मोठा निर्णय!

देशातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या विक्रम देव दत्त यांना एअर इंडिया लिमिटेडच्या (Air India) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:42 PM2022-01-18T21:42:28+5:302022-01-18T21:42:58+5:30

देशातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या विक्रम देव दत्त यांना एअर इंडिया लिमिटेडच्या (Air India) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

Senior bureaucrat Vikram Dev Dutt has been appointed as the Chairman and Managing Director of Air India | Air India: विक्रम देव दत्त यांच्या गळ्यात 'एअर इंडिया'च्या चेअरमनपदाची माळ, सरकारचा मोठा निर्णय!

Air India: विक्रम देव दत्त यांच्या गळ्यात 'एअर इंडिया'च्या चेअरमनपदाची माळ, सरकारचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली-

देशातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या विक्रम देव दत्त यांना एअर इंडिया लिमिटेडच्या (Air India) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या वरीष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी अधिकपत्याखाली फेरबदलानंतर विक्रम देव दत्त (Vikram Dev Dutt) एअर इंडियाचे सर्वात प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहेत. नुकतंच एअर इंडियाचं निर्गुंतवणुकीकरण करण्यात आलं होतं आणि टाटा ग्रूपकडे एअर इंडियाची मालकी गेली आहे. 

विक्रम देव दत्त प्रशासनात वरीष्ठ सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. एअर इंडियाच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. रँकिंगचा विचार करायचा झाल्यास एअर इंडियात आता देव दत्त कंपनीचे प्रमुख असणार असून त्यांच्याकडेच कंपनीच्या सर्व कामांची जबाबदारी असणार आहे. अतिरिक्त सचिवाच्या मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वैयक्तिक मंत्रालयाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

नॅशनल हायवेबाबतही मोठा निर्णय
केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये चंचल कुमार यांना राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. चंचल कुमार १९९२ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चंचल कुमार सध्या कॅडर प्रदेश बिहारमध्ये कार्यरत आहेत. 

Web Title: Senior bureaucrat Vikram Dev Dutt has been appointed as the Chairman and Managing Director of Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.