lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश आणि अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला कोट्यवधीचा दंड

मुकेश आणि अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला कोट्यवधीचा दंड

SEBI's big action against Ambani family : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी, तसेच अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्यावर सेबीने (SEBI) मोठी कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:03 AM2021-04-08T08:03:05+5:302021-04-08T08:06:09+5:30

SEBI's big action against Ambani family : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी, तसेच अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्यावर सेबीने (SEBI) मोठी कारवाई केली आहे.

SEBI's big action against Mukesh Ambani & Anil Ambani, Fined Rs 25 crore | मुकेश आणि अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला कोट्यवधीचा दंड

मुकेश आणि अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला कोट्यवधीचा दंड

Highlightsसेबीने २१ वर्षे जुन्या असलेल्या एका प्रकरणात अंबानी कुटुंबीयांना ठोठावला २५ कोटी रुपयांचा दंड रिलायन्स इंडस्ट्रीजचे पाच टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक शेअर खरेदी करूनही त्याची माहिती सेबीला न दिल्या प्रकरणी करण्यात आली ही कारवाई रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रवर्तक सन २००० मध्ये ६.८३ टक्के शेअर खरेदी केल्याचे विवरण सेबील देण्यात अपयशी ठरले

मुंबई - रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani ), त्यांच्या पत्नी नीता अंबानी, तसेच अनिल अंबानी (Anil Ambani) आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्यावर सेबीने (SEBI) मोठी कारवाई केली आहे. २१ वर्षे जुन्या असलेल्या एका प्रकरणात अंबानी कुटुंबीयांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) पाच टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक शेअर खरेदी करूनही त्याची माहिती सेबीला न दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (SEBI's big action against Mukesh Ambani & Anil Ambani, Fined Rs 25 crore)

सेबीने आपल्या ८५ पानांच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांनी कंपनीमधील आपल्या भागीदारीबाबत सेबीला योग्य माहिती दिली नव्हती. त्यामुळे कंपनीच्या प्रवर्तकांमधील मुकेश आणि अनिल अंबानींसह त्यांच्या पत्नी नीता आणि टीना यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय के. डी. अंबानी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

 रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रवर्तक सन २००० मध्ये ६.८३ टक्के शेअर खरेदी केल्याचे विवरण सेबील देण्यात अपयशी ठरले. मात्र नियमानुसार पाच टक्क्यांहून अधिक शेअर खरेदी केल्यास त्याची माहिती सेबीला देणे आवश्यक होते. 

दरम्यान, २००५ मध्ये अंबानी बंधूंमध्ये व्यवसायाची वाटणी झाली होती. त्यानंतर पेट्रोलियम व्यवसायाशी संबंधित रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी यांच्या वाट्याला गेली होती. तर रिलायन्सच्या अन्य कंपन्यांची मालकी अनिल अंबानी यांच्याकडे गेली होती.  

 

Read in English

Web Title: SEBI's big action against Mukesh Ambani & Anil Ambani, Fined Rs 25 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.