SBI Annuity Deposit Scheme : बँकेच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास दरमाह होईल कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:49 PM2021-10-13T19:49:00+5:302021-10-13T19:52:29+5:30

SBI Annuity Deposit Scheme: या योजनेमध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि तुम्हाला महिन्यासाठी निश्चित ईएमआय (EMI) मिळेल. 

SBI state bank of india annuity deposit scheme know scheme features | SBI Annuity Deposit Scheme : बँकेच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास दरमाह होईल कमाई!

SBI Annuity Deposit Scheme : बँकेच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास दरमाह होईल कमाई!

Next

SBI Annuity Deposit Scheme: जर तुम्ही येत्या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळेल. दरम्यान, तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या Annuity Deposit Scheme मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि तुम्हाला महिन्यासाठी निश्चित ईएमआय (EMI) मिळेल. (SBI state bank of india annuity deposit scheme know scheme features)

काय आहे एसबीआयची Annuity Deposit Scheme?
बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एसबीआयच्या Annuity Deposit Scheme मध्ये, ठेवीदाराला एकरकमी रक्कम भरावी लागते आणि समान रक्कम मासिक हप्त्यांमध्ये (EMI) मिळते. यामध्ये मूळ रकमेचा तसेच त्यावरील व्याजाचा समावेश आहे. व्याज तिमाही आधारावर कॅलक्युलेट केले जाते.

Annuity Deposit Scheme मधील फीचर्स...
- Annuity Deposit Scheme अंतर्गत, ग्राहकाला एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि ती रक्कम मंथली अ‍ॅन्युइटी इंस्टॉलमेंटच्या रूपात परत मिळेल. यामध्ये मूळ रकमेसह व्याजाचा समावेश असेल.
- ठेवीचा कालावधी 36, 60, 84 किंवा 120 महिने आहे.
- ही स्कीम एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.
- ठेवीची रक्कम संबंधित कालावधीसाठी किमान 1000 रुपयांच्या किमान मासिक अ‍ॅन्युइटीवर आधारित आहे.
- 15 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर प्रीमॅच्युअर पेमेंटची परवानगी आहे. पॅनल्टी चार्ज केला जाऊ शकतो. हे मुदत ठेवीनुसार लागू आहे. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास कोणत्याही मर्यादेशिवाय प्रीमॅच्युअर पेमेंट करता येते.
- कमाल जमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
- व्याज दर व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध मुदत ठेवींप्रमाणेच असेल.
- ठेवीच्या महिन्यानंतर महिन्याच्या त्याच तारखेला अ‍ॅन्युइटी दिली जाते.
- जर ती तारीख त्या महिन्यात अस्तित्वात नसेल (29, 30 आणि 31) तर पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी दिली जाईल.
- नॉमिनेशन सुविधा केवळ वैयक्तिक व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.
- विशेष प्रकरणांमध्ये अ‍ॅन्युइटीची बॅलन्स रक्कमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट किंवा कर्ज मिळू शकते.
- कर्ज मिळाल्यानंतर पुढील अ‍ॅन्युइटी फक्त कर्जाच्या खात्यात दिली जाईल.

English summary :
SBI state bank of india annuity deposit scheme know scheme features

Web Title: SBI state bank of india annuity deposit scheme know scheme features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app