SBI and Shapoorji Pallonji Real Estate sign MoU to offer faster home loans for their customers | SBI आणि शापूरजी पालोनजी यांच्यात करार, ग्राहकांना मिळणार घर खरेदीसाठी झटपट लोन

SBI आणि शापूरजी पालोनजी यांच्यात करार, ग्राहकांना मिळणार घर खरेदीसाठी झटपट लोन

ठळक मुद्देया कराराअंतर्गत ग्राहकांना मिळणार मोठे फायदेगृहकर्ज व्यवसायात स्टेट बँकेचा २२ टक्के हिस्सा

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बांधकाम व्यावसायातील दिग्गज नाव शापूरजी पालोनजी रिअल एस्टेट यांच्या एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी दोघांनीही सामंजस्य करार केला. या अंतर्गत शापूरजी पालोनजी यांची घरं खरेदी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत स्टेट बँकेकडून ग्राहकांना लवकर गृहकर्जाची प्रोसेस पूर्ण होणं आणि लवकरात लवकर कर्ज मंजुर होणं आदी सुविधा मिळणार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकांना युनिक व्हॅल्यू अॅडेड स्कीमचाही फायदा होणार आहे. 

"हा करार सर्वाच्याच फायद्याचा आहे. एसबीआय अप्रुव्ह्ड प्रकल्पांसाठी पाच दिवसांच्या आत कर्ज मंजुर करते. आणि हा घर खरेदीदारांसाठी प्रमुख फायदा आहे. याव्यतिरिक्त त्यांना लीगल आणि व्हॅल्युशन चार्चही द्यावा लागणार नाही. स्टेट बँक एक टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म रिटेल लोन मॅनेजमेंट सिस्टम आणेल, यावर गृहकर्जाशी निगडीत एन्ड टू एन्ड सोल्यूशन दिलं जाणार आहहे. मार्च २०२१ पर्यंत ही सेवा सुरू केली जाणार आहे," अशी माहिती स्टेट बँकेचे रिअल एस्टेट अँड हाऊसिंग बिझनेस युनिटचे प्रमुख आणि चीफ जनरल मॅनेजर श्रीकांत यांनी दिली. 

"स्टेट बँक गृहकर्जासाठी चांगल्या ऑफर्स देत असते. अशा ऑफर्स आता आमच्या ग्राहकांसाठीही उपलब्ध होती. शापूरजी पालोनजी रिअल एस्टेटच्या ग्राहकांना घर खरेदीसाठी आता गृहकर्जाचे आकर्षक दर आणि अधिक वेगवान सुविधा मिळणार आहेत. या कराराअंतर्गत वर्तमान प्रकल्प आणि नवे प्रकल्पही समाविष्ट केले जाणार आहेत," अशी माहिती शापूरजी पालोनजी रिअल एस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश गोपालकृष्णन यांनी दिली. 

गृहकर्ज व्यवसायात स्टेट बँकेचा २२ टक्के हिस्सा

स्टेट बँकेच्या रिअल एस्टेट पोर्टफोलियोनं नुकताच पाच लाख कोटी रूपयांचा टप्पा गाठला आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठा टप्पा आहे. बँकेकडे सध्या ४२ लाख गृहकर्ज खातेधारक आहे. त्यात दररोज देशभरातून १ हजार नवे ग्राहक जोडले जात आहेत. गृह कर्ज व्यवसायात स्टेट बँकेचा २२ टक्के हिस्सा आहे. सध्या बँक किमान ६.८ टक्के या व्याजदरानं गृहकर्ज उपलब्ध करून देते. केंद्र सरकारची महत्त्वाची योजना सर्वांना २०२२ पर्यंत घरं या योजनेअंतर्गत बँकेनं आतापर्यंत १.९४ लाखांपेक्षा अधिक अर्ज मंजुर केले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SBI and Shapoorji Pallonji Real Estate sign MoU to offer faster home loans for their customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.