Lokmat Money >गुंतवणूक > ५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ?

५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ?

NPS Scheme : महिन्याला गलेलठ्ठ पेन्शन मिळवण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे असं काही नाही. तुम्ही सरकारी योजनेत पैसे गुंतवून ५-५० हजार नाहीतर महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 11:12 IST2025-01-26T11:12:01+5:302025-01-26T11:12:48+5:30

NPS Scheme : महिन्याला गलेलठ्ठ पेन्शन मिळवण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे असं काही नाही. तुम्ही सरकारी योजनेत पैसे गुंतवून ५-५० हजार नाहीतर महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकता.

You will get a monthly pension of Rs 1 lakh from the government NPS scheme. | ५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ?

५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ?

NPS Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी क्षेत्रातील लोकांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे अनेकजणांना आपल्या निवृत्तीची चिंता असते. मात्र, आता काळजी करू नका. कारण, एका सरकारी योजनेतून तुम्ही फक्त पेन्शनच नाही तर कोट्याधीशही होऊ शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलत. ही कोणती स्पाँजी स्किम नाही की शेअर मार्केटचा मल्टीबॅगर स्टॉक नाही. ही सरकारने सुरू केलेली सरळसाधी गुंतवणूक योजना आहे. आम्ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेविषयी बोलतोय. यात तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन गुंतवणूक केली तर महिन्याला १ लाख रुपये पेन्शन सहज घेऊ शकता. चला याचं गणित जाणून घेऊ.

नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे काय?
एनपीएस म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. ही सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली असून यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना शेअर बाजाराशी संबंधित आहे. म्हणजे तुम्ही गुंतवलेले पैसे शेअर बाजारातील विविध शेअर्समध्ये लावले जातात. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेअर बाजाराशी निगडीत असल्याने ही योजना जोखमीच्या अधीन आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने हा धोका नाहीच्या बरोबर होतो.

एनपीएस योजनेच्या अटी आणि शर्थी काय?
कोणत्याही सरकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून एनपीएस खाते उघडता येते. निवृत्तीनंतर तुम्हाला एकूण रकमेपैकी ६० टक्के हिस्सा काढता येतो. बाकी ४० टक्के रकमेतून पेन्शन योजना सुरू करतात. जर तुमची एकूण निधी ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो संपूर्ण काढता येतो. ही संपूर्ण बचत करमुक्त असते.

महिना १ लाख पेन्शन कशी मिळणार? 
जर तुम्हाला एनपीएस योजनेतून महिन्याला १ लाख रुपये पेन्शन हवी असेल. तर तुम्हाला किमान पुढची २० वर्षी दरमहा २० हजार रुपयांची गुंतवणूक एनपीएसमध्ये करावी लागेल. ही रक्कम तुम्हाला दरवर्षी १० टक्क्यांनी वाढवावी लागेल. जर तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी १० टक्के परतावा मानला. तर २० वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ३ कोटी २३ लाख रुपये होईल. यातील ६० टक्के रक्कम म्हटलं तर एकरकमी १.८५ कोटी रुपये तुमच्या हातात मिळतील. तर ४० टक्के निधी म्हणजे १.३७ टक्के रकमेतून तुम्हाला पेन्शन सुरू होईल.  यातून तुम्हाला १ लाख रुपये मासिक पेन्शन आरामात मिळेल.

Web Title: You will get a monthly pension of Rs 1 lakh from the government NPS scheme.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.