Lokmat Money >गुंतवणूक > अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं

आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बाजारात जाऊन सोनं खरेदी करायला वेळ नसेल तर तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 30, 2025 11:11 IST2025-04-30T11:09:36+5:302025-04-30T11:11:34+5:30

आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बाजारात जाऊन सोनं खरेदी करायला वेळ नसेल तर तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता.

you can buy digital gold on the occasion of Akshaya Tritiya no tension of going to the market Gold can be purchased for rs 10 | अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं

आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बाजारात जाऊन सोनं खरेदी करायला वेळ नसेल तर तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता. डिजिटल गोल्डला आजकाल खूप मागणी आहे. डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. डिजिटल सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. गुंतवणुकीच्या दृष्टीनंही ते अतिशय सुरक्षित आहे. ते घरात ठेवण्याची किंवा चोरीला जाण्याचीही चिंता नसते.

पेटीएम गोल्ड गुगल पे (गोल्ड लॉकर), जिओ फायनान्ससारख्या पेमेंट अॅप्समधूनही तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता. या अॅप्सवर तुम्ही १० रुपयांतही सोनं खरेदी करू शकता. पेटीएम गोल्ड दररोज ९ रुपयांत सोनं खरेदी करण्याचा पर्यायही देत आहे.

स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'

गुगल पे वरून डिजिटल सोनं कसं खरेदी कराल

गुगल पेद्वारे डिजिटल सोनं खरेदी करणं अतिशय सोपं आहे. गुगल पेवर ही तुम्ही फक्त १० रुपयांत सोनं खरेदी करू शकता. गुगल पेवरून सोनं खरेदी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

१- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल पे अॅप ओपन करा.
२- आता सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर सर्च करा.
३- आता तुम्हाला इथे बाय चा पर्याय दिसेल.
४- बायवर टॅप करा आणि आपण खरेदी करू इच्छित असलेल्या सोन्याची रक्कम एन्टर करा. यामध्ये तुम्हाला २०१ रुपये, ५०१ रुपये आणि १००१ रुपयांचा डिफॉल्ट ऑप्शन मिळेल. या अॅपवरून तुम्ही १० रुपये किंवा २० रुपयांतही सोनं खरेदी करू शकता.
५- गोल्ड लॉकर तुम्हाला खरेदीबरोबरच डिजिटल सोनं विकण्याचाही पर्याय देतं.

पेटीएमवरून सोनं कसं खरेदी कराल

पेटीएम अॅपच्या मदतीनं गोल्ड एसआयपी खरेदी करणं देखील अगदी सोपं आहे. पेटीएम गोल्ड युजर्संना दररोज ९ रुपयांत सोनं खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. पेटीएम गोल्ड युजर्सला सेव्ह विकली आणि बाय लंपसमचा पर्याय देखील देते. पेटीएम गोल्डवरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता.

१- सर्वप्रथम पेटीएम अॅप ओपन करा.
२- आता सर्च बारमध्ये गोल्ड टाईप करून सर्च करा.
३- येथे तुम्हाला सेव्ह डेली आणि बाय लंपसमचा पर्याय दिसेल.
४- सेव्ह डेलीमध्ये तुम्ही ९ रुपयांची रक्कम देखील निवडू शकता.
५- तुम्ही पेटीएम गोल्ड सोन्याच्या नाण्यांमध्ये काढू शकता. याशिवाय कंपनी बँकेत कॅश ऑप्शनही देत आहे.

या अॅप्सव्यतिरिक्त तुम्ही जिओ फायनान्स, तनिष्कच्या वेबसाईटसारख्या मोठ्या ब्रँड्सकडूनही २४ कॅरेट डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती मिळवू शकता.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: you can buy digital gold on the occasion of Akshaya Tritiya no tension of going to the market Gold can be purchased for rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.