Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > पुन्हा कमी होणार का सोन्या-चांदींची किंमत? सरकारनं इम्पोर्ट ड्युटी बाबत घेतला मोठा निर्णय

पुन्हा कमी होणार का सोन्या-चांदींची किंमत? सरकारनं इम्पोर्ट ड्युटी बाबत घेतला मोठा निर्णय

Gold Silver Import Duty: सरकारनं सोन्या-चांदीवरील इम्पोर्ट ड्युटीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:33 IST2026-02-04T14:33:26+5:302026-02-04T14:33:26+5:30

Gold Silver Import Duty: सरकारनं सोन्या-चांदीवरील इम्पोर्ट ड्युटीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.

Will the price of gold and silver decrease again Government takes big decision regarding import duty reduced | पुन्हा कमी होणार का सोन्या-चांदींची किंमत? सरकारनं इम्पोर्ट ड्युटी बाबत घेतला मोठा निर्णय

पुन्हा कमी होणार का सोन्या-चांदींची किंमत? सरकारनं इम्पोर्ट ड्युटी बाबत घेतला मोठा निर्णय

Gold Silver Import Duty: केंद्र सरकारने अखेर सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात (Import Duty) कपात केली आहे. 'सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स'नं (CBIC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सोन्याची बेस आयात किंमत सुमारे ५० डॉलरनं कमी करून १,५१८ रुपये प्रति १० ग्रॅम करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत ८०० डॉलरहून अधिक कमी करून २,६५७ रुपये प्रति किलो करण्यात आली आहे. जागतिक बाजारात वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आयात शुल्काचा बोजा कमी झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

आयात शुल्कातील कपातीचं स्वरूप

ही कपात उच्च-शुद्धता असलेल्या सोन्याच्या विटा (Gold bars), नाणी आणि चांदीच्या विटांवर (Silver Bullion) लागू असेल. मात्र, दागिने, मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तू आणि पोस्ट, कुरिअर किंवा सामानाद्वारे होणाऱ्या आयातीवर ही सवलत लागू नसेल. सरकारनं अखेरिस सोन्याच्या किमती २२ जानेवारीला आणि चांदीच्या किमती २७ जानेवारीला सुधारित केल्या होत्या. सहसा सरकार दर पंधरा दिवसांनी या बेस आयात किमतींमध्ये बदल करते.

सोन्या-चांदीची किंमत घसरण्याची वाट पाहणाऱ्यांना झटका! एकाच दिवसात Gold ६६०० रुपयांनी तर Silver १२,५०० रुपयांनी महागलं

दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण

रत्न आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेने (GJEPC) अर्थसंकल्पापूर्वी सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील एकूण आयात शुल्क ४ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी केली होती. ही मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित होती. शुल्कात कपात केल्यानं बाजारातील तरलता वाढण्यास मदत होणार आहे.

भारतात सोन्या-चांदीची मागणी

भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि चांदीचा सर्वात मोठा बाजार आहे. भारत आपली सोन्याची बहुतांश गरज आयातीद्वारेच पूर्ण करतो. तसंच, चांदीची ८० टक्क्यांहून अधिक गरज परदेशातून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून असते. 'क्रिसिल रेटिंग्स'च्या (CRISIL Ratings) अभ्यासानुसार, २०२६-२७ मध्ये सोन्या-चांदीच्या किरकोळ विक्रीचे प्रमाण ५ ते ७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में गिरावट? सरकार ने आयात शुल्क घटाया।

Web Summary : सरकार ने सोने और चांदी पर आयात शुल्क कम किया। सोने का आधार आयात मूल्य 50 डॉलर प्रति 10 ग्राम और चांदी का 800 डॉलर प्रति किलो से अधिक कम हो गया। इससे उच्च शुद्धता वाले सोने और चांदी की छड़ों को लाभ होगा, जिससे बाजार में तरलता बढ़ सकती है क्योंकि मांग अधिक है।

Web Title : Gold, silver prices may fall as government cuts import duty.

Web Summary : The government reduced import duties on gold and silver. Gold's base import price decreased by $50 per 10 grams, and silver by over $800 per kilo. This benefits high-purity gold and silver bars, potentially boosting market liquidity as demand remains high.