Gold Silver Price Today : गेल्या काही काळापासून मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज, ८ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत असून, राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी चक्क १,५६,७५० रुपये इतका नोंदवला गेला आहे. दुसरीकडे, चांदीनेही उच्चांकी स्तर गाठला असून १ किलो चांदीसाठी २,८५,००० रुपये मोजावे लागत आहेत.
का वधारले सोन्या-चांदीचे भाव?
जानेवारी अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने १२० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडून विक्रमी झेप घेतली होती. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची कमकुवत स्थिती आणि जागतिक बाजारपेठेतील सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वाढलेला कल, ही या दरवाढीची मुख्य कारणे आहेत. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
| शहर | २४ कॅरेट (₹) | २२ कॅरेट (₹) | १८ कॅरेट (₹) |
| मुंबई | १,५६,६०० | १,४३,५५० | १,१७,४५० |
| पुणे | १,५६,६५० | १,४३,६०० | १,१७,५०० |
| दिल्ली | १,५६,७५० | १,४३,७०० | १,१७,६०० |
| चेन्नई | १,५७,३१० | १,४४,२०० | १,२३,५०० |
| कोलकाता | १,५६,६०० | १,४३,५५० | १,१७,४५० |
| हैदराबाद | १,५६,६०० | १,४३,५५० | १,१७,४५० |
(टीप: दर 'गुड रिटर्न्स'च्या आकडेवारीनुसार आहेत. स्थानिक कर आणि दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसमुळे दरात तफावत असू शकते.)
चांदीचे दर : १० ग्रॅमसाठी २,८५० रुपये
चांदीच्या किमतीत फेब्रुवारीत किंचित सुसूत्रता आली असली तरी दर अद्याप उच्च स्तरावर आहेत.
दिल्ली आणि मुंबई : १० ग्रॅम चांदीचा दर २,८५० रुपये असून, १०० ग्रॅमसाठी २८,५०० रुपये मोजावे लागत आहेत.
चेन्नई आणि कोलकाता : येथेही १० ग्रॅम चांदी २,८५० रुपयांच्या स्तरावर आहे.
वाचा - स्वप्नातील घर आता बजेटमध्ये! 'या' सरकारी बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त गृहकर्ज; पाहा संपूर्ण लिस्ट
गुंतवणूकदारांसाठी टीप
जर तुम्ही लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दागिन्यांऐवजी 'गोल्ड ईटीएफ' किंवा 'डिजिटल गोल्ड'चा विचार करू शकता. तसेच, खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्कची खात्री करणे विसरू नका.
