Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

Fixed Deposits : जर तुम्ही तुमच्या पैशांवर सुरक्षित आणि उच्च परतावा शोधत असाल, अनेक लहान आणि खाजगी बँका सध्या ३ वर्षांच्या FD वर ७% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:31 IST2025-11-02T14:15:29+5:302025-11-02T14:31:02+5:30

Fixed Deposits : जर तुम्ही तुमच्या पैशांवर सुरक्षित आणि उच्च परतावा शोधत असाल, अनेक लहान आणि खाजगी बँका सध्या ३ वर्षांच्या FD वर ७% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत.

Which FD is Best? Comparing Rates of PSU, Private, and Small Finance Banks on 3-Year Tenure. | तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

Fixed Deposits : जर तुम्ही तुमच्या बचतीला एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून चांगला नफा कमावू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! सध्या अनेक बँकांनी ३ वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. व्याजदरातील हा छोटासा बदल देखील तुमच्या एकूण परताव्यावर मोठा परिणाम करू शकतो, विशेषत: जर तुम्ही मोठी रक्कम किंवा दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल. त्यामुळे सध्या कोणती बँक तुमच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लघु वित्त बँका : सर्वाधिक परताव्यासाठी सर्वोत्तम
सध्याच्या परिस्थितीत, लघु वित्त बँका गुंतवणूकदारांना सर्वाधिक व्याजदर देत आहेत.

बँकेचे नाव ३ वर्षांच्या FD वर व्याजदर 
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ७.६५% (सर्वाधिक) 
स्लाइस स्मॉल फायनान्स बँक ७.५०% 
जन स्मॉल फायनान्स बँक ७.५०% 
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ७.२५% 
एयू स्मॉल फायनान्स बँक ७.१०% 

टीप - स्मॉल फायनान्स बँकांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या बँकांमध्ये फक्त ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर आरबीआयची हमी असते. याचा अर्थ तुमचे मूळ भांडवल आणि व्याज केवळ याच मर्यादेपर्यंत सुरक्षित असते.

खाजगी बँका : चांगल्या परताव्यासाठी उत्तम पर्याय
खाजगी क्षेत्रातील बँकाही ग्राहकांना आकर्षक व्याजदर देत आहेत. यामध्ये आरबीएल बँक आघाडीवर आहे.

बँकेचे नाव ३ वर्षांच्या FD वर व्याजदर 
आरबीएल बँक ७.२०% (खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक) 
एसबीएम बँक इंडिया ७.१०% 
बंधन बँक ७.००% 
येस बँक ७.००% 
डीसीबी बँक ७.००% 
इंडसइंड बँक ६.९०% 
आयसीआयसीआय बँक ६.६०% 
ॲक्सिस बँक ६.६०% 

सरकारी बँका : सुरक्षिततेसाठी आजही भरवसा कायम
जर तुमच्यासाठी पैशांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची असेल, तर सरकारी बँका आजही सर्वात विश्वासार्ह पर्याय आहेत.
| बँकेचे नाव | ३ वर्षांच्या FD वर व्याजदर |
| युनियन बँक ऑफ इंडिया | ६.६०% (सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक) |
| बँक ऑफ बडोदा | ६.५०% |
| पंजाब नॅशनल बँक | ६.४०% |
| एसबीआय | ६.३०% |

बँकेचे नाव ३ वर्षांच्या FD वर व्याजदर 
युनियन बँक ऑफ इंडिया ६.६०% (सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक) 
बँक ऑफ बडोदा ६.५०% 
पंजाब नॅशनल बँक ६.४०% 
एसबीआय ६.३०% 

वाचा - तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग

टीप: गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य बँकेची निवड करावी.

Web Title : बचत पर शानदार रिटर्न: 3 साल की FD के लिए शीर्ष बैंक

Web Summary : अधिक रिटर्न की तलाश है? छोटे फाइनेंस बैंक 3 साल की FD पर सबसे अच्छी ब्याज दरें देते हैं, उसके बाद निजी और सार्वजनिक क्षेत्र के बैंक आते हैं। जमा बीमा सीमा के कारण छोटे बैंकों के साथ सावधानी बरतें। जोखिम क्षमता और वित्तीय लक्ष्यों के आधार पर चयन करें।

Web Title : High Returns on Savings: Top Banks for 3-Year Fixed Deposits

Web Summary : Looking for high returns? Small finance banks offer the best interest rates on 3-year FDs, followed by private and public sector banks. Exercise caution with smaller banks due to deposit insurance limits. Choose based on your risk tolerance and financial goals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.