Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा

EPF VPF Retirement Corpus : ईपीएफ हे आधीच एक मजबूत निवृत्ती निधी आहे. त्यात व्हीपीएफ जोडल्याने तुमचे पैसे वेगाने वाढू शकतात. दीर्घकाळात, तुम्ही मोठ्या प्रमाणात निवृत्ती निधी जमा करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:16 IST2025-11-13T16:12:39+5:302025-11-13T17:16:02+5:30

EPF VPF Retirement Corpus : ईपीएफ हे आधीच एक मजबूत निवृत्ती निधी आहे. त्यात व्हीपीएफ जोडल्याने तुमचे पैसे वेगाने वाढू शकतात. दीर्घकाळात, तुम्ही मोठ्या प्रमाणात निवृत्ती निधी जमा करू शकता.

VPF Explained How Salaried Employees Can Maximize Retirement Corpus Beyond EPF | पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा

EPF VPF Retirement Corpus : नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या निवृत्तीनंतर आर्थिक खर्चाची चिंता असते. पण, तुम्ही आतापासूनच नियोजन केलं तर तुमचं म्हातारपण सुखात जाईल. जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच ईपीएफओच्या कक्षेत येत असाल, तर तुमच्यासाठी निवृत्ती निधी वाढवण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. तुम्ही स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधी वापरून तुमचा रिटायरमेंट कॉर्पस सुरक्षितपणे वाढवू शकता.

VPF ही तुमच्या सध्याच्या EPF खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करण्याची एक सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. यात तुम्हाला दरमहा उत्तम व्याज मिळते आणि तुमची रक्कम बुडण्याचा कोणताही धोका नसतो.

VPF म्हणजे काय?
VPF हे एक प्रकारे व्हीपीएफचेच विस्तारित स्वरूप आहे, जिथे कर्मचारी स्वतःच्या इच्छेनुसार ईपीएफमध्ये अतिरिक्त योगदान करू शकतो. व्हीपीएफमध्ये पगार कपातीची कोणतीही निश्चित मर्यादा नाही. कर्मचारी आपल्या मूळ पगाराच्या १०० टक्क्यांपर्यंत रक्कम यात जमा करू शकतो. व्हीपीएफवर मिळणारा व्याजदर हा EPF च्या दराएवढाच असतो. सध्या हा व्याजदर ८.२५ टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे, जो अनेक बँकांच्या एफडी पेक्षा जास्त आहे. या सुविधेमुळे तुम्हाला निवृत्तीच्या वेळी मोठा फंड जमा करण्याची संधी मिळते.

व्हीपीएफमध्ये कर सवलत आणि सुरक्षितता

  • कर सवलत : वॉलंटरी प्रोव्हिडंट फंडात जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.
  • व्याज कर-मुक्त: वार्षिक EPF आणि VPF योगदान २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, त्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे कर-मुक्त राहते. (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये आहे).
  • टॅक्स-फ्री विड्रॉवल: व्हीपीएफमध्ये एकदा योगदान सुरू केल्यास ते किमान ५ वर्षांसाठी सुरू ठेवणे आवश्यक आहे. ५ वर्षांची नोकरी पूर्ण झाल्यानंतर काढलेली रक्कम देखील कर-मुक्त असते.
  • व्हीपीएफमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी?

तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआर (HR)/पेरोल विभागाला भेटून व्हीपीएफमध्ये योगदान वाढवण्याची तुमची इच्छा कळवा.
तुम्हाला तुमच्या पगाराचा किती हिस्सा व्हीपीएफमध्ये वाढवायचा आहे, याची माहिती फॉर्म भरून एचआर विभागाला द्यावी लागते.
यानंतर एचआर विभाग पुढील प्रक्रिया पूर्ण करतो आणि काही काळानंतर तुमच्या पगारातून व्हीपीएफसाठी अतिरिक्त कपात सुरू होते.

वाचा - कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल

तुम्ही नोकरी बदलल्यास किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करत असल्यास, EPFO पोर्टलवर किंवा HR च्या माध्यमातून VPF जोडण्याची प्रक्रिया करता येते. तुम्ही तुमच्या EPF पासबुक, UMANG ॲप किंवा DigiLocker द्वारे दरवर्षी योगदान आणि एकूण शिल्लक तपासू शकता.

Web Title : EPFO की VPF योजना: वेतनभोगी कर्मचारियों के लिए FD से ज़्यादा सुरक्षित रिटर्न

Web Summary : वेतनभोगी व्यक्ति EPFO की VPF के साथ अपनी सेवानिवृत्ति बचत को सुरक्षित रूप से बढ़ा सकते हैं। यह FD से ज़्यादा ब्याज दरें, कर लाभ और लचीला योगदान प्रदान करता है, जिससे आरामदायक सेवानिवृत्ति सुनिश्चित होती है।

Web Title : EPFO's VPF Scheme: Higher Returns Than FD for Salaried Employees

Web Summary : Salaried individuals can boost retirement savings securely with EPFO's VPF. It offers higher interest rates than FDs, tax benefits, and flexible contributions, ensuring a comfortable retirement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.