UPI Transaction: डिजिटल पेमेंट आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. किराणा माल खरेदी करायचा असो वा ऑनलाइन शॉपिंग, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) हे सर्वात सोपे माध्यम बनले आहेत. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती किंवा बँक सर्व्हरच्या समस्येमुळे ट्रान्झॅक्शन फेल होतात. अशा परिस्थितीत केवळ गैरसोयच होत नाही, तर कधीकधी पैसेही कापले जातात.
यूपीआय पेमेंट का फेल होते?
यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल होण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे - नेटवर्कची समस्या, बँक सर्व्हर डाउन होणं, ॲपचं जुनं व्हर्जन, चुकीची खात्याची माहिती किंवा ट्रान्झॅक्शन लिमिट पार करणे. अनेकदा रिपीटेड टॅप म्हणजे वारंवार क्लिक केल्यानंही पेमेंट थांबते.
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन का थांबतात?
क्रेडिट लिमिट कमी असणे, चुकीचा कार्ड नंबर, कार्ड एक्सपायर होणं, बँकेची फ्रॉड अलर्ट सिस्टीम, ओटीपी (OTP) फेल होणं अशा कारणांमुळेही व्यवहार थांबतात. बँक अनेकदा सुरक्षेच्या कारणास्तवही पेमेंट थांबवते.
यूपीआय पेमेंट फेल झाल्यास काय करावं?
- सर्वात आधी बँक खाते आणि यूपीआय ॲपमध्ये स्टेटस तपासा.
- जर पैसे कापले गेले असतील, तर ते सामान्यतः २४–४८ तासांत ऑटो-रिव्हर्सल होतात.
- ट्रान्झॅक्शन आयडी नोंद करून घ्या आणि ॲप किंवा बँकेत तक्रार दाखल करा.
- ३–५ दिवसांत समस्या न सुटल्यास, बँकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे प्रकरणाची माहिती द्या.
क्रेडिट कार्ड पेमेंट फेल झाल्यास काय करावे?
- पैसे कापले असल्यास, आधी मर्चंटशी संपर्क साधा.
- समाधान न मिळाल्यास, बँकेत तक्रार करा किंवा चार्जबॅकची मागणी करा.
- सर्व स्क्रीनशॉट्स आणि रिसिट्स सुरक्षित ठेवा.
- जर बँकेनं ३० दिवसांत समस्या सोडवली नाही, तर प्रकरण बँकिंग लोकपालकडे घेऊन जाता येतं.
भविष्यात पेमेंट फेल होण्यापासून वाचण्यासाठी टिप्स
- चांगले इंटरनेट वापरा, ॲप अपडेटेड ठेवा.
- लाभार्थीचे तपशील दोनदा तपासा.
- वारंवार क्लिक करू नका.
- ओटीपी/यूपीआय पिन कधीही शेअर करू नका.
