Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक

UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक

UPI Rules Change 3rd November: दुकानात सामान खरेदी करण्यापासून ते घरचं बिल भरण्यापर्यंत, सर्व काही UPI नं होतं. ३ नोव्हेंबरपासून यूपीआयमध्ये काही नवीन नियम लागू होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:21 IST2025-11-01T10:19:09+5:302025-11-01T10:21:13+5:30

UPI Rules Change 3rd November: दुकानात सामान खरेदी करण्यापासून ते घरचं बिल भरण्यापर्यंत, सर्व काही UPI नं होतं. ३ नोव्हेंबरपासून यूपीआयमध्ये काही नवीन नियम लागू होत आहेत.

UPI New Rules There will be a big change in UPI payments from November 3rd Check quickly | UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक

UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक

UPI Rules Change 3rd November: दुकानात सामान खरेदी करण्यापासून ते घरचं बिल भरण्यापर्यंत, सर्व काही UPI नं होतं. ३ नोव्हेंबरपासून यूपीआयमध्ये काही नवीन नियम लागू होत आहेत. हे नियम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) तयार केले आहेत. यामुळे आपली ट्रान्झॅक्शन प्रोसेस अधिक जलद आणि सुरक्षित होईल. जर तुम्ही देखील यूपीआय ॲप्स वापरत असाल, तर हे नियम तपासा.

आत्तापर्यंत, यूपीआयमध्ये दररोज आरटीजीएसद्वारे (RTGS) १० सेटलमेंट सायकल (Settlement Cycles) चालत असत. प्रत्येक सायकलमध्ये ऑथराइज्ड म्हणजेच अधिकृत व्यवहारांसोबतच डिसप्युट व्यवहार देखील एकत्र प्रक्रिया केले जात होते. परंतु, आता व्यवहारांची संख्या इतकी वाढली आहे की हे सर्व एकाच वेळी करण्यात विलंब होतो. त्यामुळे, एनपीसीआयने निर्णय घेतला आहे की ऑथराइज्ड आणि डिसप्युट व्यवहारांना वेगवेगळ्या सायकलमध्ये विभागलं जावं. यामुळे दैनंदिन सेटलमेंट प्रक्रिया वेळेवर पूर्ण होऊ शकेल.

Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित

नवीन सेटलमेंट सायकलचे वेळापत्रक

मिंटच्या रिपोर्टनुसार, पहिले दहा सायकल केवळ ऑथराइज्ड व्यवहारांसाठी असतील, म्हणजे यांत कोणतीही डिसप्युट केस येणार नाही. हे ऑथराइज्ड सायकल अशाप्रकारे चालतील: पहिली सायकल रात्री ९ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत, दुसरी मध्यरात्रीपासून सकाळी ५ वाजेपर्यंत, तिसरी ५ ते ७ वाजेपर्यंत, चौथी ७ ते ९ वाजेपर्यंत, पाचवी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत, सहावी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत, सातवी १ ते ३ वाजेपर्यंत, आठवी ३ ते ५ वाजेपर्यंत, नववी संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत, आणि दहावी रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत राहील. जुने कट-ओव्हर टायमिंग किंवा आरटीजीएस पोस्टिंगमध्ये कोणताही बदल नाही.

आता डिसप्युट व्यवहारांसाठी दोन वेगळे सायकल तयार करण्यात आले आहेत. पहिली डिसप्युट सायकल (DC1) मध्यरात्रीपासून दुपारी ४ वाजेपर्यंत आणि दुसरी दुपारी ४ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत राहील. यांत फक्त डिसप्युट असलेले व्यवहारच प्रोसेस केले जातील. एनटीएसएल (NTSL) फाईल नेमिंगमध्ये DC1 आणि DC2 चे आयडेंटिफायर टाकले जातील. बाकी सेटलमेंट नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही, ते तसेच राहतील, जसे की टायमिंग, रिकन्सिलिएशन रिपोर्ट्स, जीएसटी रिपोर्ट्स.

बदलामुळे होणारे फायदे

मिंटच्या रिपोर्टनुसार, नियमित यूपीआय व्यवहारांना डिसप्युटमधून वेगळं करणं हे एक मोठं पाऊल आहे. यामुळे डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि स्केलेबल बनेल. ग्राहकांचा विश्वास वाढेल कारण रिफंड जलद आणि विश्वासार्ह मिळतील. बँक आणि फिनटेक कंपन्यांना स्पष्टता मिळेल, ज्यामुळे त्या नवीन सेवा सुरू करू शकतील, जसं की क्रेडिट ऑन यूपीआय, बीएनपीएल (BNPL), आणि ईएमआय, आणि तेही कोणताही वाद किंवा विलंबाशिवाय करू शकतील. यूपीआयद्वारे भारताच्या वाढत्या डिजिटल पेमेंट गरजा सुरक्षितपणे आणि सहजपणे पूर्ण करण्याचा हाच मार्ग असल्याची प्रतिक्रिया कीवी या फिनटेक कंपनीचे सह-संस्थापक सिद्धार्थ मेहता यांनी दिली.

Web Title : UPI के नए नियम: 3 नवंबर से UPI भुगतान में बड़ा बदलाव!

Web Summary : UPI में 3 नवंबर से बदलाव! NPCI ने अधिकृत और विवादित भुगतानों को अलग करके तेज, सुरक्षित लेनदेन शुरू किए। नई समय-सारणी समय पर प्रक्रिया सुनिश्चित करती है, जिससे विश्वसनीयता बढ़ती है और नई वित्तीय सेवाओं को सक्षम किया जा सकता है। रिफंड तेजी से होगा।

Web Title : UPI New Rules: Major Changes in UPI Payments From November 3rd

Web Summary : UPI is changing on November 3rd! NPCI introduces faster, secure transactions by separating authorized and dispute settlements. New schedules ensure timely processing, boosting reliability and enabling innovative financial services. Refunding will be faster.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.