Lokmat Money >गुंतवणूक > गुंतवणुकीत जोखीम नकोय? 'या' बँका FD वर देतायत ९% पर्यंत व्याजदर, फक्त ५ हजार गुंतवून व्हा मालामाल!

गुंतवणुकीत जोखीम नकोय? 'या' बँका FD वर देतायत ९% पर्यंत व्याजदर, फक्त ५ हजार गुंतवून व्हा मालामाल!

Investment Tips : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या DICGC हमी अंतर्गत ५ लाखांपर्यंतच्या बँक एफडी ठेवी संरक्षित आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची चिंता नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:52 IST2025-07-16T12:20:31+5:302025-07-16T12:52:48+5:30

Investment Tips : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या DICGC हमी अंतर्गत ५ लाखांपर्यंतच्या बँक एफडी ठेवी संरक्षित आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची चिंता नाही.

Top FD Rates 2025 utkarsh suryoday shriram shivalik and bajaj finance banks | गुंतवणुकीत जोखीम नकोय? 'या' बँका FD वर देतायत ९% पर्यंत व्याजदर, फक्त ५ हजार गुंतवून व्हा मालामाल!

गुंतवणुकीत जोखीम नकोय? 'या' बँका FD वर देतायत ९% पर्यंत व्याजदर, फक्त ५ हजार गुंतवून व्हा मालामाल!

Investment Tips : एकीकडे शेअर बाजाराचा धोका तर दुसरीकडे बँकांनी मुदत ठेवींवर कमी केलेला व्याजदर, यामुळे पैसे कुठे गुंतवावे? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तुम्हीही यापैकी एक असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी जास्तीत जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती घेऊन आलो आहोत. काही निवडक वित्तीय संस्था आणि लहान बँका (Small Finance Banks) २०२५ मध्ये एफडीवर ९% पर्यंत व्याज देत आहेत, ज्यामुळे तुमची बचत हमखास वाढेल.

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक

  • व्याजदर: अधिकृत वेबसाइटनुसार, ही बँक ९.२५% पर्यंत कमाल व्याजदर देत आहे.
  • विशेष: महिला गुंतवणूकदारांसाठी हा विशेष दर उपलब्ध आहे.
  • किमान गुंतवणूक: ५,००० रुपये

श्रीराम फायनान्स

  • व्याजदर: ही कंपनी एफडीवर ८.९७% पर्यंत उत्कृष्ट व्याज देत आहे.
  • किमान गुंतवणूक: ५,००० रुपये

बजाज फायनान्स

  • व्याजदर: बजाज फायनान्समध्ये तुम्हाला एफडीवर ८.९०% पर्यंत आकर्षक व्याजदर मिळू शकतो.
  • किमान गुंतवणूक: ५,००० रुपये

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

  • व्याजदर: या बँकेत तुम्ही जास्तीत जास्त ८.५०% व्याजदराने एफडी करू शकता.
  • कालावधी: ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या विविध कालावधींसाठी एफडी उपलब्ध आहे.
  • किमान गुंतवणूक: ५,००० रुपये

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

  • व्याजदर: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एफडीवर ८.४०% पर्यंत चांगला परतावा देते.
  • किमान गुंतवणूक: ५,००० रुपये

एफडी (FD) घेण्याचे फायदे काय आहेत?

  1. एफडीमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
  2. निश्चित परतावा: एफडीमधील व्याजदर तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वीच निश्चित होतो. बाजारातील चढउतारांचा यावर परिणाम होत नाही, त्यामुळे तुम्हाला किती कमाई होईल हे आधीच कळते.
  3. पैशांची सुरक्षितता: बँकेतील एफडीमध्ये जमा केलेल्या ५ लाखांपर्यंतची रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या DICGC हमी अंतर्गत संरक्षित असते. त्यामुळे तुमच्या पैशाला सुरक्षा मिळते.
  4. ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा: ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरांपेक्षा ०.२५% ते ०.७५% जास्त व्याज मिळते.
  5. कर्ज सुविधा: पैशांची अचानक गरज लागल्यास, तुम्हाला एफडी मोडण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या एफडीवर ९०% पर्यंत कर्ज सहज घेऊ शकता.

वाचा - लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

टीप : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Top FD Rates 2025 utkarsh suryoday shriram shivalik and bajaj finance banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.