Kids Investment Scheme: सध्याच्या काळात मुलांना बचत आणि गुंतवणुकीची सवय लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच पैशांचे व्यवस्थापन आणि वाढ करायला शिकवलं, तर भविष्यात ते स्वतःला आर्थिकदृष्ट्या सहज मजबूत करू शकतात.
यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात मुलांना खूप मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही, तर फक्त त्यांच्या पॉकेटमनीमधून दरमहा ₹२५० ची गुंतवणूक करायची आहे. याचा अर्थ रोज सुमारे ₹८.५ वाचवायचे आहेत. ही इतकी माफक रक्कम आहे की, मुलं किंवा कोणताही व्यक्ती सहज वाचवू शकतो आणि दीर्घकाळात लाखो रुपयांचा फंड तयार करू शकतो. ही योजना आहे एसबीआयची जननिवेश एसआयपी (SBI JanNivesh SIP), जी लहान गुंतवणुकीतून मोठा फायदा देते.
एसबीआयची जननिवेश एसआयपी काय आहे?
सामान्य एसआयपीमध्ये (SIP) जिथे साधारणपणे ₹५०० पासून गुंतवणूक सुरू होते, तिथे एसबीआय म्युच्युअल फंडाच्या (SBI Mutual Fund) जननिवेश एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा ₹२५० पासूनच सुरुवात करू शकता. या योजनेची विशेष बाब म्हणजे गरीब, मुलं किंवा नवीन गुंतवणूकदार यात सहज गुंतवणूक करू शकतात. ही रक्कम एसबीआय बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडात (SBI Balanced Advantage Fund) गुंतवली जाते, जो एक हायब्रिड फंड आहे.
बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड हा असा हायब्रिड फंड आहे, ज्यात इक्विटी (शेअर बाजार) आणि डेट (बॉन्ड/डिपॉझिट्स) या दोन्हीमध्ये पैसे गुंतवले जातात. फंड मॅनेजर बाजारातील परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कुठे जास्त पैसा गुंतवणं फायद्याचं होईल हे ठरवतात. यामुळे धोका कमी होतो आणि परतावा संतुलित मिळतो.
गुंतवणूक कुठून करावी?
तुम्ही एसबीआय योनो ॲप (SBI Yono App), एसबीआय म्युच्युअल फंड्स, पेटीएम (Paytm) यांसारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ऑफलाइन (बँक शाखा किंवा म्युच्युअल फंड एजंटद्वारे) देखील गुंतवणूक करू शकता. या एसआयपीमध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक असे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवड करू शकता.
किती मिळेल परतावा?
जर तुम्ही दरमहा ₹२५० एसआयपीमध्ये गुंतवल्यास १५, २० आणि ३० वर्षांत किती फंड तयार होईल, हे पाहूया. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडात मिळणाऱ्या परताव्याबाबत हमी देता येत नाही. जर १५ वर्षांसाठी तुम्ही दरमहा २५० रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक ४५ हजार रुपये होईल. यावर व्याजाच्या स्वरुपात तुम्हाला ७३,९८३ रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १,१८,९८३ रुपये मिळतील. २० वर्षांसाठी तुमची गुंतवणूक ६० हजार रुपये असून यावर तुम्हाला १,६९,९६४ रुपये व्याज मिळेल. यानंतर तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम २.२९,९६४ रुपये असेल. तर ३० वर्षांसाठी तुमची गुंतवणूक ९० हजार रुपये असेल. यावर १२ टक्क्यांनुसार तुम्हाला ६,८०,२४३ रुपये व्याज मिळू शकतं. यानंतर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम ७,७०,२४३ रुपये असू शकते. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास उत्कृष्ट चक्रवाढीचा फायदा मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे एसआयपीमध्ये शिस्त आणि नियमितता सर्वात महत्त्वाची आहे.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1: जननिवेश एसआयपी मुलांच्या नावाने उघडता येते का?
होय, तुम्ही तुमच्या मुलांच्या नावानं अल्पवयीन (Minor) म्हणून एसआयपी खाते उघडू शकता.
Q2: ₹२५० पेक्षा जास्त रक्कम गुंतवता येते का?
होय, ₹२५० ही सुरुवातीची मर्यादा आहे, तुम्ही यापेक्षा जास्तही गुंतवणूक करू शकता.
Q3: मध्येच एसआयपी थांबवता येते का?
होय, एसआयपी फ्लेक्सिबल (Flexible) आहे, तुम्ही कधीही ती थांबवू किंवा बंद करू शकता.
Q4: परतावा निश्चित (Fixed) असतो का?
नाही, म्युच्युअल फंड बाजारावरातील परताव्यावर आधारित असतात, त्यामुळे परताव्याची हमी देता येत नाही.
Q5: एसआयपीमध्ये कर लाभ मिळतो का?
बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडात केलेल्या गुंतवणुकीवर कलम ८०सी (Section 80C) अंतर्गत कर लाभ मिळत नाही, परंतु लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कमी लागतो.
