Lokmat Money >गुंतवणूक > निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून दरमहा मिळेल २०००० रुपये पेन्शन

निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून दरमहा मिळेल २०००० रुपये पेन्शन

monthly pension scheme : ज्यांना निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक आदर्श पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 10:24 IST2025-01-13T10:24:29+5:302025-01-13T10:24:29+5:30

monthly pension scheme : ज्यांना निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक आदर्श पर्याय आहे.

this saving scheme is the best for fixed income in old age 20 thousand monthly pension will start | निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून दरमहा मिळेल २०००० रुपये पेन्शन

निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून दरमहा मिळेल २०००० रुपये पेन्शन

monthly pension scheme : खासगी क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना निवृत्तीची चिंता असते. कारण नोकरी संपल्यानंतर मासिक उत्पन्न मिळत नाही. मग आवश्यक खर्च भागवणे कठीण होते. तुम्हालाही अशीच चिंता सतावत असेल तर काळजी करू नका. आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम बचत योजना घेऊन आलो आहोत. ज्येष्ठ नागरिक बचत योजने (SCSS) विषयी तुम्हाला माहिती आहे का? सरकार समर्थित ही बचत योजना सर्वाधिक ८.२% व्याजदर देते. या योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन म्हणून २० हजार रुपये सहज मिळू शकतात.

SCSS कसे कार्य करते?
ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जोडीदारासह वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे SCSS खाते उघडू शकतात. ही योजना १,००० रुपयांच्या किमान गुंतवणुकीसह जास्तीत जास्त ३० लाख प्रति खाते ठेवण्याची परवानगी देते. १ लाखांपर्यंतच्या ठेवी रोखीने करता येतात, तर १ लाखांपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे भरावी लागते.

दोन खाती, दुहेरी फायदे
पती-पत्नीच्या नावे स्वतंत्र खाती उघडून एकाच वेळी ६० लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकता. यामुळे तिमाही व्याज १,२०,३०० आणि वार्षिक उत्पन्न ४,८१,२०० रुपये होते. पाच वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत, यावर एकूण २४,०६,००० व्याज मिळू शकते.

मासिक २० हजार रुपये पेन्शन मिळवायचं गणित समजून घ्या

  • निवृत्तीनंतर SCSS खात्यात एकरकमी ३० लाख रुपये जमा करावे लागतील.
  • या गुंतवणुकीवर ६०,१५० रुपये त्रैमासिक व्याज मिळेल
  • म्हणजे वर्षाचे २,४०,६०० रुपये होतील. 
  • ५ वर्षांत मिळालेले एकूण व्याज असेल १२,०३,००० रुपये 
  • एकूण परिपक्वता रक्कम होईल ४२,०३,००० रुपये 
  • म्हणजे दर ३ महिन्यांनी तुमच्या खात्यात ६०,१५० रुपये येतील. त्याचे ३ भागात विभाजन केल्यास दरमहा २० हजार रुपये पेन्शन म्हणून सहज मिळू शकतात.

या योजनेचे मुख्य फायदे
परतावा : SCSS ८.२% वार्षिक व्याजदर मिळतो. सुकन्या समृद्धी योजनेसह सर्वात जास्त परतावा देणारी छोटी बचत योजना आहे.
कर सूट : आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत ठेवी कर सवलतीसाठी पात्र आहेत, जे खातेधारकांसाठी अतिरिक्त बचत प्रदान करते.
संपूर्ण सुरक्षा : सरकार समर्थित योजना असल्याने जमा केलेल्या रकमेची १००% सुरक्षितता मिळते.
 

Web Title: this saving scheme is the best for fixed income in old age 20 thousand monthly pension will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.