Property News : मालमत्तेतील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. सध्या अनेक लोक मालमत्तेत मोठी गुंतवणूक करत आहेत. याचे कारण म्हणजे मालमत्तेवरील उत्कृष्ट परतावा. पण, प्रॉपर्टी घेणे जसे अवघड आहे, तसेच ते विकणेही सोपे नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी खरेदी केलेली मालमत्ता विक्री करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. या टिप्स फॉलो करून, तुम्ही तुमच्या मालमत्तेची चांगली किंमत मिळवू शकत नाही. एवढेच नाही तर तुम्हाला ग्राहकही सहज मिळतील.
दुरुस्ती आणि नूतनीकरण : तुम्ही तुमची मालमत्ता विकण्याची तयारी करत असाल तर आधी ती दुरुस्त करून नूतनीकरण करा. अनेकजण विक्री करायची म्हणून मालमत्तेवर कुठलाही नुतनीकरणाचा खर्च करत नाही. पण, तुम्हाला तुमच्या मालमत्तेची चांगली किंमत हवी असल्यास ती विकण्यापूर्वी रिनोवेशन करणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकाला तुमची मालमत्ता आवडेल आणि तो तुम्हाला योग्य किंमत देऊ शकेल.
ऊर्जा बचतीवर भर : तुमची मालमत्ता बहुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर असल्यास किंवा नियोजित विकासाचा भाग असल्यास, छतावर सौर पॅनेल स्थापित करण्याचा विचार करा. सौरऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा घरांना पुरवल्या जाणाऱ्या विजेपेक्षा खूपच स्वस्त आहे. तसेच, तुम्ही संबंधित अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. संभाव्य खरेदीदार सौर उर्जेपासून कमी ऊर्जा खर्चाच्या शक्यतेमुळे घर घेण्यास उत्सुक असेल.
आधुनिक सुविधा : बदलत्या काळात लक्झरी आणि स्मार्ट होम ही संकल्पना अधिक लोकप्रिय होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचे घर विकण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला आधुनिक सुविधा देऊन चांगली किंमत मिळू शकते. कोविड १९ साथीच्या आजारापासून, लोकांनी कोणत्याही व्यत्ययाशिवाय घरून काम करता येऊ शकणाऱ्या मालमत्तेमध्ये जास्त रस दाखवला आहे.
पार्किंगची जागा : गॅरेज किंवा बंदिस्त पार्किंग स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्याची खात्री करा. लोक अंगणावरुन घराच्या स्थितीचा अंदाज लावतात. तुम्ही मालमत्तेची चांगली देखभाल केली असल्याचे यातून दिसून येईल.
सुरक्षा : सध्याच्या काळात घराची सुरक्षा ही कोणत्याही खरेदीदाराचा प्राधान्यक्रम आहे. खरेदीदार पाहत असलेली पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षा. त्यानंतरच खरेदी करण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे आपल्या घराच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या. आधुनिक सुरक्षा प्रणालींमध्ये आता इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगचा समावेश आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर आता सर्रास झाला आहे. याशिवाय अलार्म सिस्टम, स्मार्ट लॉक इत्यादींचा वापर करा.
योग्य किंमत : मालमत्तेच्या जलद विक्रीसाठी योग्य किंमत निश्चित करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वाजवी किंमत मागितली तर तुम्हाला ग्राहक लवकर मिळतील. तुम्ही तुमच्या परिसरातील मालमत्तेची किंमत जवळपासच्या प्रॉपर्टीच्या किमतीवरून जाणून घेऊ शकता. हे ब्रोकर किंवा एखाद्याला विचारून किंवा त्या क्षेत्रातील सरासरी किंमतीचा अंदाज घेऊन केले जाऊ शकते.