Lokmat Money >गुंतवणूक > दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

swp calculation : ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत एक सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आहे. यात तुम्ही मासिक पेन्शन मिळवण्यासोबत तुमची गुंतवणूकही वाढवत राहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:13 IST2025-04-13T11:12:40+5:302025-04-13T11:13:12+5:30

swp calculation : ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत एक सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आहे. यात तुम्ही मासिक पेन्शन मिळवण्यासोबत तुमची गुंतवणूकही वाढवत राहू शकता.

systematic withdrawal plan swp calculation gets 20k per month and 3 crore rupees | दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

swp calculation : वाढत्या महागाईमुळे तुमच्याकडे भविष्यात जास्तीत जास्त निधी जमा असणे आवश्यक झाले आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्य आणि इतर गरजांसाठी आतापासूनच आर्थिक नियोजन केले तर उतारवयात कोणतीही चिंता राहणार नाही. तुम्ही तुमचे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवून तुमचे भविष्यातील उद्दिष्टे साध्य करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोट्यवधी रुपये जमा करू शकता. तसेच तुम्ही मासिक उत्पन्न म्हणून दरमहा ठराविक रक्कम काढूही शकता.

ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत एक सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आहे. या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल. यातून तुम्ही आयुष्यभर दरमहा नियमित उत्पन्न मिळवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे पैसे कमी होणार नाहीत, उलट त्यावरील परताव्यामुळे ते वाढतच राहतील. सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) ही योजना SIP पेक्षा अधिक चांगली मानली जाते.

काय आहे SWP? :
जर तुम्हाला सांगितलंकी तुमच्याकडे ५० लाख रुपये आहेत. ज्यातून  तुम्ही पुढील २५ वर्षांसाठी दरमहा २०,००० रुपये काढत आहात. तरीही तुमच्याकडे सुमारे ३ कोटी रुपयांचा मोठा निधी जमा असेल. खरं वाटत नाही ना? हेच या योजनेचे वैशिष्ट्ये आहे. म्हणूनच SWP ला SIP पेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते.

३ कोटी रुपये आणि मासिक उत्पन्न कसे मिळवायचे? :
सर्वात आधी एसआयपी आणि एसडब्ल्यूपीमधील फरक समजून घ्या. एसआयपी म्हणजे पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याची योजना आहे. तर एसडब्ल्यूपी म्हणजे पद्धतशीरपणे गुंतवणूक काढून घेण्याची योजना आहे. उदा. तुम्ही १ लाख रुपये या योजनेत टाकले आहेत. त्यातून तुम्ही ५ हजार काढले. तर उरलेल्या ९५ हजारांवर तुम्हाला शेअर मार्केटच्या वाढीसोबत व्याज मिळत राहणार. तुम्ही काढलेल्या रकमेनंतर, उरलेल्या रकमेवर परतावा जोडला जात राहतो. साधारणपणे, म्युच्युअल फंड दीर्घकालीन कालावधीत दरवर्षी १२% ते १५% परतावा देतात. परंतु, येथे आपण १०% च्या आधारे परतावा मोजला आहे.

समजा तुम्ही एसआयपी किंवा शेअर बाजाराद्वारे गुंतवणूक करून ५० लाख रुपयांचा निधी उभारला आहे. आता तुम्हाला आणखी गुंतवणूक करायची नाही. पण, दर महिन्याला घरखर्चासाठी काही रक्कम मिळवायची आहे. अशा परिस्थितीत, एसडब्ल्यूपी तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. SWP कॅल्क्युलेटरच्या मदतीने आपण हे गणित समजून घेऊ.

जर तुमचा निधी ५० लाख रुपये असेल आणि तुम्ही पुढील २५ वर्षांसाठी दरमहा २०,००० रुपये काढत असाल तर तुम्ही एकूण ६०,००,००० लाख रुपये काढाल. तरीही, तुमची एकरकमी गुंतवणूक रक्कम २,९७,९४,५६७ रुपये असेल म्हणजेच सुमारे ३ कोटी रुपये. कारण दरमहा २०,००० रुपये काढल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये उरलेल्या रकमेवर व्याज देखील मिळेल, ज्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य वाढतच राहील.

वाचा - अखेर चीनसमोर अमेरिकेचं एक पाऊल मागे? ट्रम्प सरकारने 'या' वस्तूंवरील टॅरिफ केला रद्द

(Disclaimer- यामध्ये SWP योजनेविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: systematic withdrawal plan swp calculation gets 20k per month and 3 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.